Homeताज्या बातम्यासाताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठी

साताऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठी

प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी – महसूल मंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री यांचे निर्देश

मुंबई, दि. २३ : अजय मगरे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी विलंब न लावता करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

सामाजिक न्याय मंत्री यांच्या दालनात मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा येथील वास्तव्यास असतानाच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणे संदर्भात बैठक झाली. या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, दूरदृश्य प्रणालीद्वारे साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, सहसचिव सो. ना. बागुल, सहसचिव श्रीराम यादव, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, स्मारकाच्या जागेबाबत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेले दावे न्यायप्रविष्ट असल्यामुळे, जोपर्यंत संबंधित दाव्याचा निकाल लागत नाही किंवा दावेदार स्वतः दावे मागे घेत नाहीत, तोपर्यंत पुढील कार्यवाही करता येत नाही. याचिकेच्या सुनावणीवेळी पुरातत्त्व विभागाने संबंधित प्रकरणातील शासकीय अभियोक्ता यांचेकडे हे प्रकरण बरेच वर्षे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणावे आणि प्रकरणाची सुनावणी घेऊन प्रकरण निकाल काढण्याची विनंती जिल्हाधिकारी यांनी करण्याचे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, या स्मारकाच्या उभारणीतून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा व्यापक प्रसार होणार असून, भावी पिढ्यांसाठी हे स्थळ प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभाग,जिल्हाधिकारी सातारा व पुरातत्त्व विभागाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

error: Content is protected !!