Homeताज्या बातम्या१७ सप्टेंबरला देशभरात बुद्धगया–महू–दीक्षाभूमी मुक्तीसाठी जनआक्रोश मोर्चा; 

१७ सप्टेंबरला देशभरात बुद्धगया–महू–दीक्षाभूमी मुक्तीसाठी जनआक्रोश मोर्चा; 

मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एल्गार

मुंबई, दि. १५ : अजय मगरे

महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरील बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी १७ सप्टेंबर रोजी देशव्यापी जनआक्रोश आंदोलन पेटणार आहे. या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर करणार असून मुंबईत आझाद मैदानावर भव्य जनसागर उसळणार आहे.

महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते अनागारिक धम्मपाल व पेरियार स्वामी जयंती तसेच भय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून हा दुसरा टप्पा राबवला जात आहे. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, बौद्ध भिक्खु संघ आणि आंबेडकरी विचाराच्या असंख्य संघटना-मंडळांच्या माध्यमातून हे

आंदोलन उभारण्यात आले आहे.

आंदोलनाच्या तीन प्रमुख मागण्या :—

१) बोधगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे द्यावे. बिहार सरकारच्या १९४९ च्या कायद्याने फक्त ४ बौद्ध सदस्यांचा समावेश हा असंवैधानिक असल्याचे स्पष्ट करून हा कायदा रद्द करावा व व्यवस्थापनात डॉ. भीमराव य. आंबेडकर यांचा कायम समावेश करावा……!

२) महू जन्मस्थळ स्मारकाचे व्यवस्थापन आंबेडकरी समाजाकडे द्यावे. मध्यप्रदेश सरकारने उभारलेले हे भव्य स्मारक बाबासाहेबांच्या विचारधारेला विरोधी पद्धतीने चालवले जात असल्याने ते त्वरित दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया/डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याकडे सोपवावे……!

३)नागपूर दीक्षाभूमीवरील बेकायदेशीर कब्जा दूर करून मूळ मालक दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कडे व्यवस्थापन द्यावे. पार्किंगच्या नावाखाली चाललेले विद्रूपीकरण तत्काळ थांबवावे……!

मुंबईत आझाद मैदानावर भव्य मोर्चा….

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर व रायगड जिल्ह्यांचा संयुक्त मोर्चा आझाद मैदानावर सकाळी १०.३० वाजता निघणार असून त्याचे नेतृत्व डॉ. भीमराव आंबेडकर स्वतः करतील. या मोर्च्यातून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

या संदर्भात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलाचे केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. एस. के. भंडारे यांनी माहिती देत सर्वांनी या अस्मितेच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!