Homeताज्या बातम्या८६ झोपु योजनांमध्ये नवीन विकासकांची नियुक्ती; 

८६ झोपु योजनांमध्ये नवीन विकासकांची नियुक्ती; 

रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय

मुंबई, दि.१६ ( मंगेश म्हात्रे )

मुंबई उपनगरातील रखडलेल्या ८६ झोपु योजनांमध्ये नवीन विकासकांची नियुक्ती करण्याचा मार्ग अखेर खुला झाला आहे. या योजनांमधील विद्यमान विकासकांकडून न भरण्यात आलेल्या भाड्यामुळे व प्रकल्प रखडल्यामुळे रहिवाशांची मोठी अडवणूक होत होती. आता संबंधित विकासकांचे अधिकार संपुष्टात आणून रहिवाशांना नव्या विकासकांची निवड करता येणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) घेतला आहे.

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज एसआरए कार्यालयात भेट देऊन उपनगरातील रखडलेल्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी एसआरएचे सीईओ महेंद्र कल्याणकर आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री शेलार यांनी रखडलेल्या योजना व नागरिकांच्या तक्रारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

एसआरएच्या आकडेवारीनुसार, २०२२ पासून मुंबईतील झोपु योजनांमध्ये १३८२.४८ कोटी रुपयांचे भाडे विकासकांकडून थकले होते. त्यापैकी ७३५.६७ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, मे २०२५ पर्यंत अजूनही ६४६ कोटी रुपये थकीत आहेत. या पार्श्वभूमीवर ८६ योजनांमधील विकासकांना कायदेशीर नोटीस देण्यात आली असून त्यानंतर त्यांचे अधिकार संपुष्टात आणण्यात येणार आहेत.

नवीन प्रणालीअंतर्गत, रहिवाशांना विकासकांची नियुक्ती करण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. तसेच आगावू दोन महिन्यांतच एसआरएने ५५२ कोटी रुपयांची वसुली केली आहे. या कामगिरीबद्दल मंत्री शेलार यांनी एसआरएचे कौतुकही केले.

या बैठकीदरम्यान मंत्री शेलार यांनी अभियंते व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून कामकाजाची माहिती घेतली. नागरिकांच्या आसन व्यवस्थेपासून कार्यालयीन सुविधा यांचीही पाहणी करण्यात आली. मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, नागरिकांची अडवणूक थांबवून योजना लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात.

घरांच्या चाव्यांचे वाटप -दरम्यान, वांद्रे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत न्यायालयासाठी दिलेल्या जमिनीमुळे बाधित झालेल्या १०४ रहिवाशांना शासनातर्फे घरे देण्यात आली आहेत. यातील २४ रहिवाशांना आज पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

राष्ट्रीय महिला पॅनेल TCS ला 127 युनिट्सवर स्वतंत्र PoSH पॅनेल तयार करण्याचे निर्देश देते

राष्ट्रीय महिला आयोगाने टीसीएसच्या नाशिक युनिटमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि PoSH अनुपालनामध्ये "पद्धतशीर अंतर" दर्शविला. दिल्ली/पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला त्यांच्या...

सानिया मिर्झाने अँड्रीवाला फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीची ट्रॉफी जिंकण्यासाठी टिप्स दिली पुणे बातम्या

सानिया मिर्झा म्हणाली की, रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये महिलांचे मैदान हे एक "ओपन मिक्स" आहे आणि मीरा अँड्रीव्हाला नवीन ग्रँडस्लॅम चॅम्पियन...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

error: Content is protected !!