Homeताज्या बातम्याठाण्यातील संतोषीमाता गृहनिर्माण संस्थेच्या १४ झोपडीधारकांना पात्रता आदेश वाटप

ठाण्यातील संतोषीमाता गृहनिर्माण संस्थेच्या १४ झोपडीधारकांना पात्रता आदेश वाटप

ठाणे, दि.२९ ( अजय मगरे )

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत आज ठाणे मुख्यालयात,पाचपाखाडी येथील संतोषीमाता सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या १४ झोपडीधारकांना त्यांच्या पात्रतेचे आदेश महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अंतर्गत वाटप करण्यात आले.

ही योजना सन २०१६ मध्ये प्राधिकरणात दाखल करण्यात आली होती. मात्र, पात्रता निश्चितीनंतर एकूण १७ झोपडीधारक मयत झाल्यामुळे त्यांच्या वारसांची नोंदणी रखडली होती. वारस नोंदणी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी प्राधिकरणाने संबंधित वारसांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ११ एप्रिल २०२५ रोजी एकूण १४ वारसांनी कागदपत्रांसह अर्ज सादर केले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्राप्त अर्जांवर ६० दिवसांच्या आत कार्यवाही करण्याची अट असताना, प्राधिकरणाने केवळ १६ दिवसांत कार्यवाही पूर्ण करून आदेश पत्रक वाटपाचा कार्यक्रम सेवा हक्क दिनाच्या औचित्याने आयोजित केला.

मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या हस्ते आदेशपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी सचिव श्रीम. आश्विनी सुर्वे-पाटील, उपजिल्हाधिकारी अमित शेडगे, विकासक श्रीमती मुग्धा देसाई, मुख्य प्रवर्तक श्रीम. लक्ष्मी मोहन शर्मा तसेच संबंधित झोपडीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व लाभार्थी झोपडीधारकांनी प्राधिकरणाच्या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत, मुख्य कार्यकारी अधिकारी व उपजिल्हाधिकारी यांचे विशेष आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतीत कष्ट करणाऱ्या महिलांना आता ‘शेतकरी’ म्हणून मान्यता..

प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू मुंबई : अजय मगरे शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांना आता ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी...

अंबिका नगरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था; नागरिकांचा संताप

ठाणे, दि.१७.( अजय मगरे ) अंबिका नगर नं. २, शिवराय गल्ली येथील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड-पुणे थेट रेल्वेसेवा सुरू 

१७ सप्टेंबरला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; बीडकरांची दीर्घकाळची मागणी पूर्ण   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबरपासून बीड-पुणे दरम्यान पहिली दैनंदिन थेट...

क्यूआर कोडधारक फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा..

जनवादी हॉकर्स सभेची पालिका आयुक्तांकडे मागणी; तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचीही मागणी मुंबई : अजय मगरे मुंबई महापालिकेने २०१४च्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्रे देऊन...

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

error: Content is protected !!