Homeताज्या बातम्याकोपरगाव बाजार समितीतील भ्रष्टाचाराची चौकशी; सचिव सक्तीच्या रजेवर

कोपरगाव बाजार समितीतील भ्रष्टाचाराची चौकशी; सचिव सक्तीच्या रजेवर

कोपरगाव, दि.१४ ( दिलीप गायकवाड )

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असलेल्या कथित बोगस आणि भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी दिले आहेत. कोपरगाव बाजार समितीच्या सचिवावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून स्वतंत्र चौकशी करण्यासाठी अधिकृत चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्या आदेशानुसार, संबंधित तक्रारींमध्ये नमूद मुद्द्यांवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३, नियम १९६७ तसेच बाजार समितीच्या मंजूर उपविधी आणि इतर संबंधित कायद्यांनुसार सखोल व मुद्देनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

काँग्रेस नेते विजय सुधाकर जाधव, यांनी दिनांक २३ एप्रिल २०२५ व ३० एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या अर्जांमध्ये सचिव यांनी बाजार समितीच्या व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. अर्जदाराने यापूर्वीही सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, कोपरगाव तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

विजय जाधव यांनी त्यांच्या अर्जात नमूद केले आहे की, सचिव यांचे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सखोल संबंध असल्यामुळे त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील त्रिसदस्यीय किंवा पाच सदस्यीय स्वतंत्र समितीमार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती.

अर्जात असेही नमूद आहे की, जर या प्रकरणाची १५ दिवसांत चौकशी झाली नाही, तर अर्जदार आत्मदहनाचा मार्ग अवलंबतील. त्यामुळे परिस्थितीची गांभीर्य ओळखून, विभागीय सहनिबंधकांनी तातडीने निर्णय घेत सचिव यांच्यावरील चौकशीसाठी अधिकृत चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांनी चौकशीचे वस्तुनिष्ठ व कार्यसुझक अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे कोपरगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून बाजार समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपास आणि चौकशी अहवालावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!