सपोनि.सचिन पंडित यांचे स्पष्ट आवाहन : “अनोळखी लिंक, कॉल टाळा”
पैठण, दि. १८ : अभिजित सोनवणे
नांदर (ता. पैठण) येथील स्व. नामदेवराव पिवळ उच्च माध्यमिक विद्यालयात पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनी सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता देणारा कार्यक्रम पार पडला.
“सायबर गुन्हे हे केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक त्रास देणारेही असतात. सोशल मिडियावरील बनावट लिंक, अनोळखी फोन कॉल्स, ई-मेलमधील संशयास्पद अॅटॅचमेंट यापासून दूर राहा,” असा सल्ला पंडित यांनी विद्यार्थ्यांना दिला. पालकांनीही मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे, असे ते म्हणाले.
शाळेच्या आवारात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, तसेच विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी आणि शिक्षकांच्या परवानगीशिवाय कुठेही जाऊ नये, असेही पंडित यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला सरपंच विजय गायकवाड, उपसरपंच आस्मानदादा काळे, माजी उपसरपंच रेवणनाथ कर्डीले, युवा नेते उदयसेन काळे, मित्रवर्धन काळे, पोलीस पाटील गोपाल वैद्य, मुख्याध्यापक सूर्यकांत धुपे, बबन भावले, राजेंद्र थोरात, रामकृष्ण पातकळ, हरसिंग पाटील, रमेश पवार, संजय गुलालकर, श्रीमती राऊत, पत्रकार सोमनाथ सातपुते, दिगंबर सोनवणे, अंबादास एडके, भगवान सोरमारे, अभिजित सोनवणे, अजय मगरे, गोरखनाथ सोनवणे, श्री कदम आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले.




















