Homeताज्या बातम्यामुंबईच्या आठवणींना उजाळा;

मुंबईच्या आठवणींना उजाळा;

 एमएमआरडीए आयुक्तांच्या हस्ते हेरिटेज माहितीपुस्तिका ग्रंथमालेचे प्रकाशन

मुंबई, दि. २१ : प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मुंबईच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला उजाळा देत ‘वारसा तुमच्या हाती’ ही चार भागांची माहितीपुस्तिका ग्रंथमाला प्रकाशित केली. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते आज मुंबईत या ग्रंथमालेचे प्रकाशन करण्यात आले.

एमएमआर हेरिटेज कन्झर्व्हेशन सोसायटीच्या (एमएमआर-एचसीएस) आर्थिक सहाय्याने आणि ‘द पीपल प्लेस प्रोजेक्ट’तर्फे या पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत.

२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘अ वॉक थ्रू मुंबई फोर्ट’ या पहिल्या खंडाच्या यशानंतर पुढे सादर करण्यात आलेल्या या नव्या माहितीपुस्तिकांमध्ये मुंबई महानगर प्रदेशातील ऐतिहासिक स्थळांची माहिती पायी फिरण्याच्या मार्गांसह मांडण्यात आली आहे. या चार पुस्तिकांमध्ये खालील खंडांचा समावेश आहे,

अ वॉक थ्रू कल्याण-ठाणे — हेत शाह व श्वेतल पाटील…..!

अ वॉक थ्रू वसई-सोपारा-विरार — पास्कल रोक लोप्स……!

अ वॉक थ्रू मुंबादेवी-डोंगरी — मानसी चोक्सी व इसा शेख….!

अ वॉक थ्रू मुंबई सबर्ब्स : बांद्रा अ‍ॅण्ड कोस्टल ट्रेल्स — मिनाझ अन्सारी

या पुस्तिकांमध्ये नकाशे, पुरावे, आकर्षक चित्रे आणि संदर्भीय माहिती देऊन वाचकांना त्या त्या परिसराचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, अशा पद्धतीने मांडणी केली आहे.

प्रकाशन प्रसंगी बोलताना डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, “मुंबई महानगर प्रदेशाचा विकास करताना त्याचा समृद्ध वारसाही लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या पुस्तिकांच्या माध्यमातून नव्या पिढीला इतिहास आणि वर्तमान यांचा दुवा साधता येईल.”

१९व्या-२०व्या शतकातील औद्योगिकीकरणाच्या लाटेत विस्मृतीत गेलेल्या सांस्कृतिक ठेव्यांना नव्याने उजाळा देण्याचा आणि नागरिकांचा या वारशाशी संबंध दृढ करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

ही माहितीपुस्तिका मालिका लवकरच प्रमुख पुस्तकविक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहे. इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी ही एक उपयुक्त भेट ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

error: Content is protected !!