कोपरगांव, दि २८ : चंद्रकांत जोर्वेकर
स्वर्णकार भारती सेवा संस्थान (राष्ट्रीय सोनार संगठन) यांच्या वतीने संजय प्रभाकर खरोटे यांची कोपरगांव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सदर नियुक्ती पत्र स्वर्णकार भारती सेवा संस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष, डाॅ.भरत वाघ,व राष्ट्रीय सचिव, रामचंद्र कपिले, आणि भारतकुमार वाघ, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहे.
संजय खरोटे हे भारतीय जनता पार्टीच्या ओ.बी.सी. मोर्चाचे कोपरगांव शहर उपाध्यक्ष असून, त्यांचे श्रीकृष्ण अलंकार हे सोनार व्यवसायाशी संबंधित दुकान कोपरगाव शहरात आहे. याशिवाय, ते स्वर्णकार कारागीर आहे .समाजसेवेची आवड असलेल्या खरोटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सोनार समाजाच्या हितासाठी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या या निवडीमुळे समाजबांधवांत आनंदाचे वातावरण आहे.
नियुक्तीनंतर बोलताना संजय प्रभाकर खरोटे यांनी सांगितले की, “वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील. समाजावरील निष्ठा जपत, त्याच्या हितासाठी काम करणे हीच माझी प्राथमिकता असेल.”
या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, सोनार समाजाच्या संघटनासाठी ही नियुक्ती एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.




















