कोपरगाव, दि. २८ : दीपक साटोटे
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील बेट येथील काशिईश्वर महादेव मंदिर व श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना २०० किलो शाबुदाणा खिचडीचे उपवास फराळ स्वरूपात वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन मौजे लौकी, दहेगांव बोलका येथील चांगदेव कारभारी कदम पाटील आणि शिर्डीचे ऋषिकेश विलासराव कोते पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.
शिवप्रेमी व महादेव भक्तांसाठी भावपूर्ण सेवाभावातून हा उपवास फराळ वितरित करण्यात आला असून, उपस्थित भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
श्रावण महिन्यातील भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम परिसरात कौतुकास्पद ठरला आहे.




















