Homeताज्या बातम्यासंकल्प ते सिद्धी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील चार महत्त्वाच्या पायाभूत...

संकल्प ते सिद्धी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील चार महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन…

‘मुंबई इन मिनिट्स’ उपक्रमाला मिळाली नवी चालना; वाहतुकीत वेग, आराम आणि जागतिक दर्जा….

मुंबई, दि. १४ : ( अजय मगरे )

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) तर्फे शहरातील वाहतुकीची गती वाढवणारे आणि शहरी विकासाला नवा वेग देणारे चार महत्वाचे पायाभूत प्रकल्प आज उद्घाटनाच्या टप्प्यावर पोहोचले. या प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर उपमुख्यमंत्री व एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई उपनगर पालकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सांताक्रूज-चेंबूर लिंक रोडचा शेवटचा टप्पा आणि मुंबईत वाढतं मेट्रोचं जाळं ही ‘मुंबई ५९ मिनिटांत’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेची पूर्तता आहे. एमएमआरडीएची प्रकल्पं फक्त वाहतूक कमी करत नाहीत, तर रोजगार निर्माण करून मुंबईला जागतिक नकाशावर ठळक ओळख देतात.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले, “मेट्रो ही मुंबईची लाईफलाईन ठरेल. मल्टी-लेव्हल उड्डाणपूल, कोस्टल रोड, एसटीपी यामुळे कोंडी कमी होईल आणि मुंबई खड्डेमुक्त होईल. मुंबईला ‘ग्लोबल हब’ बनवणे हे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.”

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “हे प्रकल्प फक्त कॉंक्रिटचे नमुने नसून, मुंबईच्या भविष्यातील गती, सुरक्षितता आणि गुणवत्ता यांची हमी आहेत. महायुती सरकार मुंबईच्या विकासासाठी नवे पंख देत आहे.”

महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले, “‘मुंबई इन मिनिट्स’ हा फक्त वाहतूक सुधारण्याचा उपक्रम नाही, तर शहराच्या भविष्याचा आराखडा आहे. प्रत्येक प्रकल्प हा मुंबईच्या नव्या ओळखीचा ठसा आहे.”

सांताक्रूज-चेंबूर लिंक रोड विस्तार (दक्षिण आशियातील पहिला १०० मी. त्रिज्येचा तीव्र वळणाचा केबल-स्टेड पूल)….

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना सिग्नलविरहित जोडणी……

चेंबूर- विलेपार्ले प्रवासात १ तासाची बचत…

२१५ मी. ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकसह एकूण लांबी १.६६ किमी….

मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय)….

देशातील सर्वात मोठे मेट्रो प्रशिक्षण केंद्र….

सिम्युलेशन-आधारित ड्रायव्हिंग व मेंटेनन्स प्रशिक्षण….

एकाच वेळी १४४ प्रशिक्षणार्थींना क्षमता; १० वर्षांत ₹२५५ कोटींची बचत….

मालवणीतील कर्मचारी निवासी इमारत….

१५६ सदनिकेसह २० मजल्यांच्या दोन इमारती….

रोबोटिक कार पार्किंग व प्रगत सुरक्षा प्रणाली…..

कलानगर उप-उड्डाणपूल (आर्म “डी”)…

धारावी व वांद्रे-वरळी सी लिंक दरम्यान सिग्नलविरहित पूर्व-पश्चिम जोडणी….

लांबी ३४० मीटर; रुंदी ८.५ मीटर….

या चारही प्रकल्पांच्या उद्घाटनामुळे मुंबईच्या वाहतुकीला वेग, सुरक्षितता आणि जागतिक दर्जा मिळून ‘संकल्प ते सिद्धी’ या संकल्पनेला प्रत्यक्ष गती मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!