Homeताज्या बातम्यानांदेड–मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ उद्घाटन

नांदेड–मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ उद्घाटन

मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.२६ : अजय मगरे

मराठवाड्याच्या प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी दळणवळण सुविधांची उभारणी हे सरकारचे प्राधान्य आहे. “नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस मुळे मराठवाड्याला मुंबईशी अधिक वेगवान जोडणी मिळाली असून, या गाडीमुळे मराठवाड्याच्या समृद्धीचे नवे द्वार खुले झाले आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनप्रसंगी केले.

नांदेड रेल्वे स्थानकावरून ‘नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस’ ला मंत्रालयातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी मंत्रालयात आयोजित कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश कुमार पांडे, विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेला नवे रूप लाभत आहे. प्रगत देशांप्रमाणे वेगवान, आरामदायी आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ‘वंदे भारत’ ही त्याची साक्ष आहे. नांदेड–मुंबई दरम्यान ६१० किलोमीटरचा प्रवास केवळ ९ ते ९.३० तासांत पूर्ण होणार असून, पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. गाडीची क्षमता ५०० वरून १४४० इतकी वाढली असून डबे ८ वरून २० करण्यात आले आहेत.”

नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना जलद व आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदन करीत सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

नांदेड येथील कार्यक्रमास खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड परिशेत्राचे पोलिस उपमहनिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, डीएमआर प्रदीप कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये : मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस.

६१० कि.मी. अंतर फक्त ९ तास ३० मिनिटांत पूर्ण; इतर गाड्यांच्या तुलनेत वेळेत मोठी बचत.

आठवड्यातून सहा दिवस सेवा – नांदेडहून बुधवार व मुंबईहून गुरुवार वगळता दररोज धावणार.

व्यापारी, अधिकारी, भाविक तसेच नियमित प्रवासी यांच्यासाठी सोयीची सुविधा.

महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वातानुकूलित, आरामदायी व सुरक्षित प्रवास.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!