कोपरगाव, दि.२३ : ( विजय हलवाई )
ऑल इंडिया किसान काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सुधाकर जाधव यांनी कोपरगाव आगार व्यवस्थापक अमोल भाऊसाहेब बनकर यांच्याकडे निवेदन देऊन भाविकांसाठी अतिरिक्त बससेवेची मागणी केली आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक सप्तशृंगी गडाकडे जातात. त्यांच्या सोयीसाठी कोपरगाव आगारातून तीन बस गाड्या नियमित सुरू कराव्यात, अशी जाधव यांनी मागणी केली. भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी ही मागणी पुढे आली आहे.
याशिवाय कोपरगाव–अकोला (संगमनेर मार्गे) या मार्गाला मान्यता देऊन बसेस सुरू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली. तसेच कोपरगाव–टाकळी–खदं–धामोरी–निफाड–पिंपळगाव बसवंत–पिंपळगाव विगड या मार्गावर बससेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असेही जाधव यांनी नमूद केले.
या मागणीवर स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी वर्गाने समाधान व्यक्त केले असून एस.टी. प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




















