Homeताज्या बातम्याएकाच दिवशी ५१८७ अनुकंपा व ५१२२ एमपीएससी उमेदवारांना नियुक्तीपत्रे वाटप – मुख्यमंत्री...

एकाच दिवशी ५१८७ अनुकंपा व ५१२२ एमपीएससी उमेदवारांना नियुक्तीपत्रे वाटप – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. १ : अजय मगरे

राज्यातील शासकीय सेवेत दीर्घकाळ रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कुटुंबांना दिलासा दिला आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी ५१८७ अनुकंपा उमेदवार आणि ५१२२ एमपीएससी उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे एकाच दिवशी प्रदान केली जाणार आहेत. तब्बल १०,३०९ नियुक्त्यांचा हा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे.

शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना नोकरीची संधी दिली जाते. मात्र तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे हजारो प्रकरणे रखडली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संवेदनशील प्रश्नात लक्ष घालून सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले. सततच्या आढाव्यांनंतर नवीन अनुकंपा धोरण राबवण्यात आले आणि यामुळे प्रलंबित अनुशेष संपुष्टात आला.

मुख्य कार्यक्रम ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत पार पडणार असून, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तर राज्यातील पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांत नियुक्तीपत्रांचे वितरण करतील.

सर्वाधिक नियुक्त्या कोकण विभागात

या कार्यक्रमात सर्वाधिक ३०७८ उमेदवार कोकण विभागातील, तर २५९७ विदर्भातील आहेत. पुणे विभागात १६७४, नाशिक विभागात १२५०, तर मराठवाड्यातील १७१० उमेदवारांना शासकीय सेवेत रुजू होण्याची संधी मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

error: Content is protected !!