Homeताज्या बातम्याएनएमडीपीएल आणि अदानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने धारावी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; २००...

एनएमडीपीएल आणि अदानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने धारावी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार

मुंबई, दि. ९ : मंगेश म्हात्रे

धारावीतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी नव भारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल) आणि अदानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘धारावी स्कूल्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा क्लब, धारावी येथे होणाऱ्या या स्पर्धेत परिसरातील ३० पेक्षा अधिक शाळांमधील २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

बुद्धिबळ या मेंदूला धार लावणाऱ्या खेळामधून विद्यार्थ्यांच्या संज्ञानात्मक क्षमतेत आणि धोरणात्मक विचारात वाढ व्हावी, आत्मविश्वासाची जोपासना व्हावी, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. समग्र विकासासाठी क्रीडा आणि शिक्षण यांची सांगड घालण्यावर आयोजकांचा भर आहे.

या स्पर्धेची खास आकर्षक बाब म्हणजे भारतीय बुद्धिबळ तारा आर. प्रज्ञानंद यांची उपस्थिती. ते विद्यार्थ्यांसमोर प्रदर्शनीय खेळ सादर करणार असून, लक्ष केंद्रीकरण, शिस्त, संयम आणि स्पर्धात्मकतेची सांगड कशी घालायची याबाबत मार्गदर्शनही करणार आहेत.

धारावीच्या पुनर्विकासाकडे फक्त बांधकाम-केद्री प्रकल्प म्हणून न पाहता मानवी भांडवलात गुंतवणूक म्हणून पाहण्याचा एनएमडीपीएलचा दृष्टीकोन या स्पर्धेतून स्पष्ट दिसून येतो. अदानी ग्रुपच्या तळागाळातील क्रीडा विकास मोहिमेलाही या उपक्रमामुळे नवे बळ मिळत आहे.

शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे धारावीत एका प्रेरणादायी आणि स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होणार असून, तरुणाईला मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती गाठण्यासाठी या स्पर्धेचे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे, असा आयोजकांचा विश्वास आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे जिल्ह्यासाठी डीपीसी अंतर्गत 1,472 कोटी रुपयांची तरतूद: सुनेत्रा पवार

पुणे : पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) अंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री...

क्रीडा वकील चंदीगड टेनिसच्या देखरेखीसाठी तदर्थ पॅनेलची नियुक्ती करण्याचे आवाहन करतात

चंदीगड टेनिसमध्ये पद्धतशीर सुधारणांसाठी पुढाकार घेणाऱ्या क्रीडा वकिलांनी केंद्रशासित प्रदेशात खेळाचे संचालन करण्यासाठी तदर्थ समितीची मागणी केली आहे.गेल्या काही वर्षांत चंदीगड लॉन...

उपकरप्राप्त इमारतींच्या रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडाची डिजिटल तक्रार प्रणाली सुरू

ट्रान्झिट रेंटच्या तक्रारींवर आता झटपट कारवाई मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाने दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू आणि रहिवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत डिजिटल...

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

error: Content is protected !!