Homeताज्या बातम्याठाणे महापालिका निवडणूक : प्रभाग १७ मध्ये काटे की टक्कर, वागळे इस्टेटचे...

ठाणे महापालिका निवडणूक : प्रभाग १७ मध्ये काटे की टक्कर, वागळे इस्टेटचे राजकारण तापले;

ठाणे, दि.३ : अजय मगरे

आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वागळे इस्टेट विभागातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या प्रभागात विविध पक्षांचे मातब्बर उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक रंगतदार आणि चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

प्रभाग क्रमांक १७-अ मध्ये राजकीय चित्र स्पष्ट झाले असून एकता भोईर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे या प्रभागात कोणतीही लढत न होता निकाल निश्चित झाला आहे.

मात्र प्रभाग क्रमांक १७-ब मध्ये खरी राजकीय लढत पाहायला मिळणार आहे. येथे

पूजा किरण ढमाळ (मनसे),

संध्या सुनील मोरे (शिवसेना) आणि

पूजा सुरेश मोरे (वंचित बहुजन आघाडी)

यांच्यात थेट सामना रंगणार असून तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

प्रभाग क्रमांक १७-क मध्ये बहुपक्षीय लढत होत असून

सागर गंगाराम खरात (शिवसेना – उबाठा),

प्रभात विभूती झा (काँग्रेस),

प्रकाश संभाजी शिंदे (शिवसेना) आणि

अनिकेत बंडू मोरे (वंचित बहुजन आघाडी)

हे उमेदवार मैदानात आहेत. या प्रभागात मतांचे विभाजन कोणाच्या बाजूने होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तसेच प्रभाग क्रमांक १७-ड मध्येही लढत तितकीच चुरशीची असून

सुखदेव उबाळे (शिवसेना – उबाठा),

योगेश जानकर (शिवसेना) आणि

राधाकिशन (राजू) डावरे (वंचित बहुजन आघाडी)

यांच्यात थेट सामना होणार आहे.

एकूणच प्रभाग क्रमांक १७ मध्ये शिवसेनेचे दोन्ही गट, मनसे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात प्रतिष्ठेची लढाई रंगली असून वागळे इस्टेट विभागातील ही निवडणूक ठाणे महापालिकेच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

विक्रोळीतील ६१० घरे आता फक्त HIG साठी; म्हाडाची अर्ज प्रक्रियेला २८ मेपर्यंत मुदतवाढ

म्हाडाचा मोठा निर्णय; अर्जाची मुदतही वाढवली मुंबई : मंगेश म्हात्रे मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर...

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीने पकड घट्ट केली, राष्ट्रवादीच्या...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

नक्षलग्रस्त भागात २४ वर्षे आरोग्यसेवेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला सोयम कोण? राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय...

नवी दिल्ली महाराष्ट्रातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात गेली तब्बल २४ वर्षे निस्वार्थ आरोग्यसेवा देणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम या अचानक राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्या आहेत....

खासगी बसवाल्यांची मनमानी आता बंद? अवैध ट्रॅव्हल ॲप्स विरोधात सरकारचा मोठा ‘ॲक्शन प्लॅन’

तिकीट दरांची लूट थांबवा; परिवहन मंत्र्यांचा थेट आदेश मुंबई -मंगेश म्हात्रे प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून आर्थिक लूट करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर राज्य सरकारने आता...

error: Content is protected !!