Homeताज्या बातम्याखासगी बसवाल्यांची मनमानी आता बंद? अवैध ट्रॅव्हल ॲप्स विरोधात सरकारचा मोठा ‘ॲक्शन...

खासगी बसवाल्यांची मनमानी आता बंद? अवैध ट्रॅव्हल ॲप्स विरोधात सरकारचा मोठा ‘ॲक्शन प्लॅन’

तिकीट दरांची लूट थांबवा; परिवहन मंत्र्यांचा थेट आदेश

मुंबई -मंगेश म्हात्रे

प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून आर्थिक लूट करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट इशारा देत, “प्रवाशांची लूट कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

अनधिकृत मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर बुकिंग आणि मनमानी भाडेवाढीवर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सह परिवहन आयुक्तांसह सुराज्य अभियानाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला असून, समिती लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

राज्यात अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या नियम धाब्यावर बसवून प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः सुट्ट्या, सण आणि आपत्कालीन काळात तिकीट दर गगनाला भिडत असल्याने सामान्य प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती. आता या सर्व प्रकारांवर परिवहन विभागाची करडी नजर राहणार आहे.

याशिवाय बसस्थानकांवरील सुविधा, स्वच्छता आणि संपर्क यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे मोफत करण्यात येणार असल्याची मोठी घोषणाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे खासगी बस ऑपरेटर्स आणि अवैध ट्रॅव्हल ॲप्सवर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!