Homeताज्या बातम्यानक्षलग्रस्त भागात २४ वर्षे आरोग्यसेवेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला सोयम कोण? राष्ट्रपतींच्या...

नक्षलग्रस्त भागात २४ वर्षे आरोग्यसेवेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला सोयम कोण? राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने’ गौरव

नवी दिल्ली

महाराष्ट्रातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात गेली तब्बल २४ वर्षे निस्वार्थ आरोग्यसेवा देणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम या अचानक राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्या आहेत. शांतपणे काम करणाऱ्या या नर्सिंग अधिकाऱ्याचा सन्मान आता थेट राष्ट्रपती भवनात झाला असून, राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

देशभरातून निवडक १५ नर्सिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या सर्वोच्च सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील उज्ज्वला सोयम यांचे नाव विशेष ठरले. कारण त्यांनी केवळ रुग्णसेवा केली नाही, तर नक्षलप्रभावित आणि दुर्गम भागात आरोग्यव्यवस्थेवर लोकांचा विश्वास निर्माण करण्याचे मोठे काम उभे केले.

चंद्रपूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या उज्ज्वला सोयम यांनी अनेक वर्षे अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा बजावली. रस्ते नसलेली गावे, अपुरी वैद्यकीय साधने, नैसर्गिक आपत्ती आणि सततची भीती यामध्येही त्यांनी आरोग्यसेवेची जबाबदारी खांद्यावर घेतली. विशेषतः आदिवासी भागात कन्याभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेले जनजागृती अभियान आणि महिलांमध्ये आरोग्याविषयी निर्माण केलेली जागरूकता आजही चर्चेचा विषय आहे.

उच्च जोखीम असलेल्या गर्भवती महिलांची काळजी घेणे, बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करणे आणि दुर्गम भागातील महिलांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळवून देणे यासाठी उज्ज्वला सोयम यांनी सातत्याने पुढाकार घेतला. त्यामुळे अनेक मातांना आणि बालकांना नवजीवन मिळाल्याचे सांगितले जाते.

या विशेष पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या.

‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार’ हा देशातील नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. या पुरस्कारामध्ये पदक, प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र आणि एक लाख रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.

दुर्गम भागातील हजारो कुटुंबांसाठी ‘आरोग्याची आधारवड’ ठरलेल्या उज्ज्वला महादेव सोयम यांच्या कार्यामुळे आता महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा उजळलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

error: Content is protected !!