Homeताज्या बातम्याविक्रोळीतील ६१० घरे आता फक्त HIG साठी; म्हाडाची अर्ज प्रक्रियेला २८ मेपर्यंत...

विक्रोळीतील ६१० घरे आता फक्त HIG साठी; म्हाडाची अर्ज प्रक्रियेला २८ मेपर्यंत मुदतवाढ

म्हाडाचा मोठा निर्णय; अर्जाची मुदतही वाढवली

मुंबई : मंगेश म्हात्रे

मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील तब्बल ६१० सदनिका आता केवळ उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, घरांच्या किमतीत ७.५ टक्क्यांची कपात करत प्रत्येक घरासोबत मोफत वाहनतळ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०२६ च्या घरसोडतीत एकूण १२२१ सदनिका उपलब्ध आहेत. त्यापैकी मोठा हिस्सा आता उच्च उत्पन्न गटासाठी राखीव करण्यात आल्याने मध्यमवर्गीय अर्जदारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, अर्जदारांना दिलासा देत ऑनलाईन अर्ज आणि अनामत रक्कम भरण्याची मुदत २८ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुकांना २८ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार असून, २९ मेपर्यंत अनामत रक्कम भरता येईल.

म्हाडाच्या माहितीनुसार, सुधारित संगणकीय प्रणाली १४ मेपासून अद्ययावत होणार आहे. अंतिम अर्जदारांची यादी १६ जून रोजी जाहीर केली जाणार असून, सोडतीची तारीख आणि वेळ नंतर घोषित केली जाईल.

म्हाडाने नागरिकांना केवळ अधिकृत संकेतस्थळ आणि ‘IHLMS 2.0’ मोबाइल ॲपद्वारेच अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, दलालांच्या आमिषांना बळी पडू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!