Homeताज्या बातम्यादिव्यांगांच्या यूडीआयडी ओळखपत्रांची तपासणी अनिवार्य....

दिव्यांगांच्या यूडीआयडी ओळखपत्रांची तपासणी अनिवार्य….

बनावट प्रमाणपत्र प्रकरणात कडक कारवाई – सचिव तुकाराम मुंढे

मुंबई, दि.५ : अजय मगरे

दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) हे शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण, विविध शासकीय योजना, आर्थिक सवलती तसेच इतर लाभांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्र, अलीकडे काही ठिकाणी बनावट अथवा चुकीच्या वैद्यकीय तपासणी अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मिळविण्याचे प्रकार समोर येत असल्याने गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारांमुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असून, यूडीआयडी कार्ड जारी करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय तपासणी अहवालांची काटेकोर पडताळणी करणे आवश्यक असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

चुकीचे अथवा बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र घेणे किंवा देणे हा कायद्याने गुन्हा असून, अशा प्रकरणांमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही सचिव मुंढे यांनी दिला आहे.

सचिव मुंढे यांनी सांगितले की, अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (AYJNISHD) येथे प्रत्यक्ष तपासणी न करता तयार केलेले बनावट अहवाल तसेच संस्थेच्या अधिकृत तपासणीवर आधारित नसलेले अहवाल राज्य व केंद्र शासनाच्या विविध सवलती व लाभ मिळविण्यासाठी सादर केल्याचे काही प्रकरणांमध्ये निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर, यूडीआयडी कार्ड या संस्थेमार्फत जारी झाल्याचे दर्शविणारे सर्व श्रवण व भाषण तपासणी अहवाल पडताळणीसाठी संस्थेच्या अधिकृत ayjnihh-mum@nic.in

या ई-मेल पत्त्यावर पाठविणे अनिवार्य असल्याचे प्रसिद्धीपत्रक अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूटने काढले आहे. संबंधित कार्यालयांनी तात्काळ कार्यवाही करावी, तसेच चुकीची माहिती देऊन दिव्यांगत्व प्रमाणपत्र अथवा लाभ घेऊ नयेत, असे आवाहनही सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

विक्रोळीतील ६१० घरे आता फक्त HIG साठी; म्हाडाची अर्ज प्रक्रियेला २८ मेपर्यंत मुदतवाढ

म्हाडाचा मोठा निर्णय; अर्जाची मुदतही वाढवली मुंबई : मंगेश म्हात्रे मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर...

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीने पकड घट्ट केली, राष्ट्रवादीच्या...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

नक्षलग्रस्त भागात २४ वर्षे आरोग्यसेवेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला सोयम कोण? राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय...

नवी दिल्ली महाराष्ट्रातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात गेली तब्बल २४ वर्षे निस्वार्थ आरोग्यसेवा देणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम या अचानक राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आल्या आहेत....

खासगी बसवाल्यांची मनमानी आता बंद? अवैध ट्रॅव्हल ॲप्स विरोधात सरकारचा मोठा ‘ॲक्शन प्लॅन’

तिकीट दरांची लूट थांबवा; परिवहन मंत्र्यांचा थेट आदेश मुंबई -मंगेश म्हात्रे प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून आर्थिक लूट करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर राज्य सरकारने आता...

error: Content is protected !!