Homeताज्या बातम्याप्रजासत्ताक दिनी झालेली कारवाई चुकीची; वनमंत्री गणेश नाईक यांनी मागितली जाहीर माफी

प्रजासत्ताक दिनी झालेली कारवाई चुकीची; वनमंत्री गणेश नाईक यांनी मागितली जाहीर माफी

श्रमजीवी संघटनेच्या लढ्याची दखल; प्रजासत्ताक दिनी बोरीवली येथे झालेल्या कारवाईबाबत वनमंत्र्यांची जाहीर माफी

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींच्या घरांवरील तोडक कारवाईला स्थगिती*

उसगाव, २७, ( प्रतिनिधी )

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींच्या घरांवर प्रजासत्ताक दिनी करण्यात आलेल्या तोडक कारवाईच्या निषेधार्थ काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानासमोर श्रमजीवी संघटनेकडून न्यायाची दाद मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष (मंत्रीदर्जा) आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क साधला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई पुढे ढकलण्याचे आदेश दिले. परंतु आज पुन्हा सकाळी आठ वाजल्यापासून एसआरपी, वनविभाग व पोलीस यंत्रणा कारवाईसाठी सज्ज झाली असतानाच, आज दुपारी एक वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे वनमंत्री गणेश नाईक यांनी तातडीची बैठक बोलावली आणि आदिवासींच्या घरांवरील तोडक कारवाईला स्थगिती देण्याचे स्पष्ट आदेश दिले.

या बैठकीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे त्याच ठिकाणी व त्यांच्या इच्छेनुसार पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती मांडण्यात आली. संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी २०१५ साली ऐच्छिक मरणाची मागणी केल्याचा संदर्भ देत, “घरं पाडण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला,” असा तीव्र सवाल करीत प्रजासत्ताक दिनीच आदिवासींच्या घरांवर बुलडोझर फिरवल्याचा निषेध वनमंत्र्यांसमोर उपस्थित केला.

यावर प्रतिक्रिया देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रजासत्ताक दिनी वनअधिकाऱ्यांकडून झालेली तोडक कारवाई चुकीची असल्याची स्पष्ट कबुली देत, या कारवाईबाबत जाहीर माफी मागितली. जोपर्यंत मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होऊन आदिवासींच्या पुनर्वसनाबाबत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणतीही तोडक कारवाई करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाला दिले.

आज दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत माजी आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार प्रकाश सुर्वे, आमदार राजेंद्र गावित, आमदार संजय उपाध्ये, माजी खासदार गोपाळ शेट्टी तसेच श्रमजीवी संघटनेच्या व विवेक पंडित यांच्या वतीने श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, नलिनी बुजड तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनसंरक्षक (CCF) अनिता पाटील, सचिव म्हैसकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत पुण्यातील तंत्रज्ञांची ६२ लाख रुपयांची फसवणूक

पुणे : सिंहगड रोड येथील एका सॉफ्टवेअर अभियंत्याची (४९) ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ६२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी...

13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणाला 20 वर्षांची शिक्षा. पुणे बातम्या

पुणे : हडपसर परिसरात आपल्या १३ वर्षीय मुलीवर १३ मे २०१८ रोजी घरात बलात्कार केल्याप्रकरणी शहरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीपी रागीट यांच्या...

मुलगा भिंतीमध्ये अडकला, सुटका

पुणे : जांभूळवाडी रस्त्यावरील हौसिंग सोसायटीच्या दोन भिंतींचे भाग कापून अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी सात वर्षांच्या मुलाची सुटका केली.शहरातील अग्निशमन दलाच्या...

महाराष्ट्रातील नागरिक आता 100 रुपयांची इच्छापत्र कधीही आणि कुठेही मिळवू शकतात; आम्हाला काय माहित...

पुणे: राज्यभरातील नागरिक आता 517 उपनिबंधक कार्यालयांपैकी कोणत्याही वेळी 100 रुपये नोंदणी शुल्क भरून त्यांच्या इच्छापत्रांची नोंदणी करू शकतात आणि त्यांचे संरक्षण...

गाय छाप तंबाखू पुड्यांवरील चित्र हटवण्याची मागणी; ‘माझं गाव माझा अभिमान’ संघटनेचा इशारा

कोपरगाव, दि.६.दिलीप गायकवाड तंबाखूच्या पुड्यांवर वापरण्यात येणाऱ्या ‘गाय छाप’ तसेच गाय दुधाचे चित्र असलेल्या चिन्हांवर बंदी घालून ते तात्काळ हटवावे, अशी मागणी ‘माझं गाव माझा...

error: Content is protected !!