दावरवाडी, दि. ४.( अभिजीत सोनवणे )
नांदर येथील शांताबाई तान्हाजी मगरे (वय ८५) यांचे बुधवारी (दि.४) सकाळी सुमारे अकरा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी सहा वाजता नांदर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मगरे यांच्या आई तर पोलीस कर्मचारी विश्वंभर मगरे यांच्या आजी होत.




















