Homeताज्या बातम्या*ठाणे महापालिकेच्या नगररचना विभागातील आगीची सीआयडी चौकशी करा – शेकाप ठाणे शहर...

*ठाणे महापालिकेच्या नगररचना विभागातील आगीची सीआयडी चौकशी करा – शेकाप ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांची मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी

ठाणे, दि.१०. ( प्रतिनिधी )

ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील शहर विकास (नगररचना) विभाग कार्यालयात दिनांक ८ जून २०२६ रोजी लागलेली आग ही अत्यंत गंभीर आणि संशयास्पद घटना असून या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

नगररचना विभाग हा विकास आराखडे, बांधकाम परवानग्या, टीडीआर, आरक्षणे तसेच विविध महत्त्वपूर्ण प्रशासकीय कागदपत्रांशी संबंधित संवेदनशील विभाग आहे. त्यामुळे या विभागात आग लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसारमाध्यमांमधून काही महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रकरणात आगीचे नेमके कारण काय होते, सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, कोणत्या कागदपत्रांचे नुकसान झाले, डिजिटल अभिलेख सुरक्षित आहेत का तसेच या घटनेचा सार्वजनिक हिताच्या बाबींवर काही परिणाम झाला आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे ऋषिकेश तायडे यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पुढील मागण्या केल्या आहेत :

• या आगीची सीआयडीमार्फत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
• आगीचे कारण, नुकसानाचे स्वरूप आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी तांत्रिक व फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी.
• आगीत प्रभावित झालेल्या सर्व कागदपत्रे, डिजिटल नोंदी व अभिलेखांचा तपशील सार्वजनिक करण्यात यावा.
• भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व महापालिकांमध्ये अभिलेख संरक्षण, डिजिटल बॅकअप आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे.
• चौकशी अहवाल निश्चित कालावधीत सार्वजनिक करण्यात यावा.

जनतेच्या करातून चालणाऱ्या संस्थांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकून राहण्यासाठी या घटनेची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचेही ऋषिकेश तायडे यांनी नमूद केले असून राज्य शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

‘2 महिला सहकाऱ्यांनी तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले’: पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी डेथ नोटमध्ये काय...

पुणे: आयटी फर्मच्या 48 वर्षीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या दोन कर्मचाऱ्यांसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...

अहिल्यानगर एज्युकेशन ट्रस्टने पुण्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालये पाच वर्षांपासून बनावट मान्यतांवर चालवली, चार गुन्हे...

एज्युकेशनल ट्रस्टने खोटे सरकारी आदेश आणि बनावट मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे पुणे : विमाननगर आणि हडपसर येथे कार्यरत असलेल्या दोन कनिष्ठ...

जंतरमंतर 2.0 जून 20: झुरळ जनता पार्टीचे अभिजीत दिपके म्हणाले की धर्मेंद्र प्रधान राजीनामा...

पुण्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिपके म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) कॅम्पसमध्ये शांततापूर्ण आंदोलनासोबतच हा गट आपला शैक्षणिक जाहीरनामा नंतर...

नसरापूर खटला निर्णायक टप्प्यात; 48 साक्षीदार तपासण्यात आल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे

आजपर्यंत एकूण 48 साक्षीदार तपासण्यात आले पुणे: नसरापूर बलात्कार आणि खून खटल्यातील खटला निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, आतापर्यंत 48 फिर्यादी साक्षीदार तपासले गेले...

error: Content is protected !!