Homeताज्या बातम्यातंबाखूच्या पुड्यांवरील धार्मिक प्रतीकांच्या गैरवापराविरोधात कोपरगावात आंदोलन; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

तंबाखूच्या पुड्यांवरील धार्मिक प्रतीकांच्या गैरवापराविरोधात कोपरगावात आंदोलन; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

प्रकरण FDA आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडे वर्ग; ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा

कोपरगाव | प्रतिनिधी

तंबाखूच्या पुड्यांवर पंढरपूर, ‘ओम’ आणि ‘गाय’ यांसारख्या धार्मिक व सामाजिक प्रतीकांचा व्यावसायिक वापर करून हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करत ‘माझा गाव माझा अभिमान’ संघटनेने कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास स्थगित केले आहे.

संघटनेचे विनय सुभाषराव भगत, विजय जाधव, अमित आढाव, मयूर आव्हाड, लक्ष्मण सताळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी २३ जुलैपासून आंदोलन सुरू केले होते. ‘ओम पंढरपुरी तंबाखू’ आणि ‘गायछाप तंबाखू’ या उत्पादनांवरील धार्मिक प्रतीकांचा व्यावसायिक वापर तातडीने बंद करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती.

आंदोलनाची दखल घेत कोपरगावचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी संघटनेला लेखी पत्र देत, १६ जुलै रोजी सादर केलेल्या निवेदन व पुराव्यांच्या आधारे हे प्रकरण पुढील कारवाईसाठी जिल्हा अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि ट्रेडमार्क कार्यालय, मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने प्रकरण सक्षम प्राधिकरणाकडे पाठवून कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या विनंतीचा मान राखत आंदोलन आणि आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, संबंधित तंबाखू कंपन्यांवर ठोस आणि अंतिम कारवाई न झाल्यास यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ‘माझा गाव माझा अभिमान’ संघटनेने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!