Homeताज्या बातम्याशेतकरी नेते डॉ. अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी....

शेतकरी नेते डॉ. अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी….

शेतकरी नेते डॉ. अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी….

सीपीआय(एम)चे २४ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन यशस्वीरीत्या संपन्न…..

मुंबई, दि.२ ( प्रतिनिधी )

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय-एम) महाराष्ट्र राज्य सचिवपदी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या देशभरातील सर्व राज्यांमध्ये सर्वात लहान वयातील राज्य सचिव म्हणून डॉ. नवले यांनी मान पटकावला आहे.

सीपीआय(एम)चे २४ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन २७ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान संपन्न झाले. या तीन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातून आलेले ३३७ प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनात सामाजिक आणि राजकीय विषयांवरील आठ ठराव मांडण्यात आले, जे एकमताने मंजूर करण्यात आले.
राज्य सचिवपदाची जबाबदारी यापूर्वी सांभाळणारे डॉ. उदय नारकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पदावरून निवृत्ती घेतली.
त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्य राजकीय आणि संघटनात्मक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालावर ५९ प्रतिनिधींनी चर्चा केली, ज्यामध्ये १४ महिला सहभागी होत्या. चर्चेनंतर अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

अधिवेशनात नवीन ५० सदस्यीय राज्य कमिटी आणि १५ सदस्यांचे राज्य सचिव मंडळ निवडण्यात आले. याच नवनिर्वाचित कमिटीने डॉ. अजित नवले यांची राज्य सचिव म्हणून नियुक्ती केली.

यावेळी पॉलिट ब्युरो सदस्य आणि पक्ष समन्वयक प्रकाश कारत, निलोत्पल बसू आणि डॉ. अशोक ढवळे यांची उपस्थिती होती. आगामी २४ व्या मदुराई पक्ष काँग्रेससाठी १७ प्रतिनिधी आणि २ प्रेक्षकांची निवड देखील या अधिवेशनात करण्यात आली.

समारोपाच्या भाषणात डॉ. अशोक ढवळे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत, धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवण्याचे आणि संघटना बळकट करण्याचे आवाहन केले.समारोपाच्या भाषणात डॉ. अशोक ढवळे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत, धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवण्याचे आणि संघटना बळकट करण्याचे आवाहन केले.

सौजन्य – दिपक पवार

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!