Homeताज्या बातम्यारणरणत्या उन्हात धारावीकरांचा जनआक्रोश: SRAवर धडकला मोर्चा, ‘५०० चौ.फूट घरा’ची ठाम मागणी

रणरणत्या उन्हात धारावीकरांचा जनआक्रोश: SRAवर धडकला मोर्चा, ‘५०० चौ.फूट घरा’ची ठाम मागणी

मुंबई, दि. ४ — तळपत्या उन्हातही आज हजारो धारावीकर रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. “सर्व धारावीकर पात्र, अदानी फक्त अपात्र” या घोषणांनी आज धारावी ते वांद्रे दरम्यानचा परिसर अक्षरशः घोषणानी गाजला.

धारावीतील प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला ५०० चौरस फुटांचे घर धारावीतच मिळाले पाहिजे, यासाठी आज सोमवार ता (४ मे ) रोजी सकाळी ११ वाजता भव्य मोर्चा काढण्यात आला. धारावी मधील कुंभारवाडा येथून निघालेला हा मोर्चा (SRA) कार्यालयावर धडकणार होता.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, मोर्चा अडवला

सुमारे २ हजार नागरिकांचा सहभाग असलेल्या या मोर्चासाठी ३०० पेक्षा अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. मोर्चा शांततेत सुरू असताना साहिल हॉटेल चौकात पोलिसांनी अडवला, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली २५ जणांचे शिष्टमंडळ SRA कार्यालयात गेले.

डीआरपीने धारावीचा एक परिपूर्ण आराखडा-मास्टर प्लॅन बनवावा.हा  मास्टर प्लॅन धारावीच्या चौका चौकात लावावा. लोकांच्या मोबाईलवर हा प्लॅन व्हाट्सअप वर टाकावा.

-अनिल देसाई, खासदार,दक्षिण मध्य मुंबई

“अदानी कंपनीची गुंडगिरी तात्काळ थांबवावी; वाढीव एफएसआयचा फायदा देत धारावीतील सर्व पात्र-अपात्रांना किमान ५०० चौ.फुटांची घरे द्यावीत.”

-वर्षा गायकवाड, खासदार, उत्तर मध्य मुंबई

“धारावीतील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे अबाधित ठेवावीत; २०११ च्या नियमानुसार पात्रता देत सर्वांना ५०० चौ.फुटांची घरे कोणतीही कंजूषी न करता द्यावीत.”

-ज्योती गायकवाड, आमदार,धारावी

“धारावीतील विकास धारावीतच झाला पाहिजे; बाहेर जमीन देणे अन्यायकारक आहे. सर्व धारावीकरांना घर आणि दुकान मिळालंच पाहिजे, अन्यथा अदानीला एकही विट रचू देणार नाही.”

-बाबुराव माने, माजी आमदार, धारावी

     या जनआक्रोश मोर्चात  शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक जोसेफ कोळी,टी.एम.जगदीश,नगरसेविका अर्चना शिंदे,नगरसेविका हर्षला मोरे, काँग्रेसच्या नगरसेविका आशा दीपक काळे, नगरसेवक बब्बू  खान, विठ्ठल मोरे,राष्ट्रवादी शपचे धारावीचे अध्यक्ष उलेश गजाकोश,भाकपचे मुंबई  नसरुल हक, माजी नगरसेवक  प्रकाश नकाशे,सपाचे राहूल गायकवाड,असफाक खान, बिजनेस असोसिएशनचे समीर मंगरु,अन्सार शेख,मनसेचे आरिफ शेख,काँग्रेसचे दीपक खंदारे,शकील चौधरी,आपचे राफेल पॉल , शिवसेनेचे शाखाप्रमुख विठ्ठल पवार ,महादेव शिंदे, किरण काळे,आनंद भोसले, मुन्ना शेख, सतिष कटके, मनी कडंन,गणेश तेवर, समन्वयक सुरेश सावंत, गंगा देरबर, विठ्ठल पवार, बसपाचे शामलाल जैस्वार, महादेव शिंदे, कुंचीकोरवे समाजाचे ज्येष्ठ नेते जगन भोसले आदींसह धारावीमधील  मोठा जनसमुदाय या मोर्चात सहभागी झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!