Homeताज्या बातम्याहॉस्पिटल परिसरातील मोबाईल चोरीचा उलगडा; पोलिसांच्या सापळ्यात सराईत आरोपी, ९ मोबाईल जप्त

हॉस्पिटल परिसरातील मोबाईल चोरीचा उलगडा; पोलिसांच्या सापळ्यात सराईत आरोपी, ९ मोबाईल जप्त

मुंबई | प्रतिनिधी

रात्रीच्या शांततेचा फायदा घेत सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीचा भोईवाडा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. परिमंडळ ४ च्या पथकाने केलेल्या कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण ९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेची सुरुवात केईएम रुग्णालयातील एका डॉक्टरांचा मोबाईल चोरीला गेल्याने झाली. ४ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री ते पहाटे दरम्यान घडलेल्या या चोरीनंतर भोईवाडा पोलीसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी गुन्हा रजि. क्र. ०९/२०२६ अंतर्गत कलम ३०३(२) भा.न्या.सं. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील ४० ते ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला. तांत्रिक विश्लेषणातून फिरोज इस्माईल शेख (वय ४०) हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. तो विशेषतः मध्यरात्री हॉस्पिटल परिसरात येऊन मोबाईल चोरी करत असल्याची बाब तपासात उघड झाली.

यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने काही दिवस गुप्त पाळत ठेवत सापळा रचला. अखेर १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १ वाजता आरोपी चोरीच्या उद्देशाने परिसरात आल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत २ मोबाईल मिळाले, तर पुढील चौकशीत आणखी ७ मोबाईल जप्त करण्यात आले.

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ४ च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मिशन भरारी’ला शिंदेंचा हिरवा झेंडा; ठाणे ग्रामीण विद्यार्थ्यांची अवकाशाकडे झेप

ठाणे : अजय मगरे ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अवकाश संशोधनाचा अनुभव देणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी हिरवा झेंडा...

शिवसेनेतर्फे जय भवानी नगरमध्ये मराठी भाषा वर्गांची सुरुवात; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी उपक्रम ठरणार महत्त्वाचा

ठाणे : अजय मगरे   स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी शिवसेना तर्फे जय भवानी नगर येथे मराठी भाषा वर्गांचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे....

माटुंग्यात आंबेडकरवादी स्त्रियांच्या कवितांची अनोखी मैफल रंगणार

'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय‘ पुस्तकाचे प्रकाशन   मुंबई : अजय मगरे   आंबेडकरवादी स्त्रियांच्या काव्यपरंपरेचा वेध घेणाऱ्या ‘'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय ’ या काव्यसंग्रहाच्या...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

बेकायदेशीर फलकांना आळा घालण्यासाठी PMC होर्डिंगवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

error: Content is protected !!