Homeक्राईम“महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला?; अशोक खरात प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप

“महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला?; अशोक खरात प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप

मुंबई -मंगेश म्हात्रे

अशोक खरात प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत महाराष्ट्रातील सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. खरात प्रकरणातील धक्कादायक तपशील वाचून “गरगरल्यासारखं झालं” असल्याचे सांगत त्यांनी या घटनेला महाराष्ट्राच्या अधःपतनाचे द्योतक म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, संतांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशा प्रकारचे प्रकार घडणे अत्यंत लज्जास्पद आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या विचारवंतांनी घडवलेल्या समाजमनाला आज अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीने ग्रासल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

तसेच, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे करणारेच काही लोक आज अशा प्रकरणात अडकले असल्याचा विरोधाभास त्यांनी अधोरेखित केला. “राजकारण्यांच्या आशीर्वादाने अशोक खरातसारखे लोक बळावतात, ही अत्यंत भीषण बाब आहे,” असे ते म्हणाले.

या प्रकरणात महिलांचे शोषण होत असल्याचा आरोप करत त्यांनी याकडे अत्यंत गंभीर गुन्हा म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली. राजकीय सत्तेसाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे समाजातील मूल्यांचा ऱ्हास होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण उघडकीस आणल्याचा दावा केला असला तरी, इतक्या काळ हे प्रकार सुरू असताना सरकारला याची माहिती का मिळाली नाही, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणाचा वापर राजकीय हेतूसाठी होत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.

माध्यमांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा पाठपुरावा थांबवू नये आणि दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत हा मुद्दा जिवंत ठेवावा.

राज्यात महिलांवरील अत्याचार, अपहरण आणि ड्रग्सचा वाढता प्रभाव याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. “दैवी शक्तीच्या नावाखाली स्त्रियांचं शोषण होत असेल, तर यापेक्षा गंभीर काहीच नाही,” असे ते म्हणाले.

शेवटी, या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, अन्यथा संत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!