डॉ. महेंद्र कल्याणकर यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
मुंबई,दि.२० ( प्रतिनिधी )
राज्य शासनाच्या क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी राबविण्यात आलेल्या “१०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखडा” उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील ९५ महामंडळांमधून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (झोपुप्रा), बृहन्मुंबई कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल झोपुप्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा सन्मान मिळवताना झोपुप्रा, बृहन्मुंबई कार्यालयाने नागरी पुनर्वसन, गतीमान निर्णयप्रक्रिया आणि नागरिकाभिमुख सेवा यामध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार विविध निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये कार्यक्षमतेचा वेग, पारदर्शकता, तांत्रिक नवोऊपक्रम व नागरिकांशी सुसंवाद यांचा समावेश होता. झोपुप्रा कार्यालयाने सर्व निकषांमध्ये उच्च कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला.




















