Homeताज्या बातम्या२५ वर्षे रखडलेल्या वरळी SRA प्रकल्पाविरोधात रहिवाशांचा एल्गार

२५ वर्षे रखडलेल्या वरळी SRA प्रकल्पाविरोधात रहिवाशांचा एल्गार

मोर्च्यानंतर प्रशासनाचे आश्वासन; प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाईची तयारी

मुंबई : मंगेश म्हात्रे 

वरळी नाका परिसरातील प्रेम नगर आणि सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्प गेल्या तब्बल २५ वर्षांपासून रखडल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि बहुजन शक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आज रहिवाशांनी एसआरए कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निषेध नोंदवला.

मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाशी बैठक घेत निवेदन सादर केले. बैठकीत प्रकल्प रखडविण्यास कारणीभूत ठरलेल्या विकासकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे विशेष अधिकारी श्री. मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि संबंधित विकासकावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, विकासकाने ५७ रहिवाशांना भाडे न दिल्याचा गंभीर मुद्दाही उपस्थित करण्यात आला. सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवारयांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला होता; मात्र तो धनादेश बाऊन्स झाल्याची माहिती समोर आली. यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रहिवाशांनी प्रशासनाकडे प्रकल्पासाठी ठोस कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करण्याची, तसेच अपयशी ठरलेल्या विकासकाची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात कॉ. शैलेंद्र कांबळे, मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार, बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी, नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!