Homeताज्या बातम्याकोपरगांव तालुक्यात संत भिमा भोई महाराज जयंतीचे बॅनर फाडले; भोई समाजात तीव्र...

कोपरगांव तालुक्यात संत भिमा भोई महाराज जयंतीचे बॅनर फाडले; भोई समाजात तीव्र संताप

कोपरगांव, दि. २७ ( दिपक साटोटे )

कोपरगांव तालुक्यातील कोळपेवाडी येथे भोई समाजातील संत शिरोमणी भिमा भोई महाराज यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला भव्य बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण भोई समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, समाजातील युवकांनी कोपरगांव पोलीस ठाणे ग्रामीण येथे लेखी निवेदन देऊन या प्रकाराचा निषेध करत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

सदर बॅनरवर भगवान महादेव व छत्रपती शिवाजी महाराज यांचेही छायाचित्र होते. त्यामुळे हा प्रकार केवळ बॅनर फाडण्यापुरता मर्यादित नसून, भोई समाजाची जाणीवपूर्वक छेडछाड करून धार्मिक व सामाजिक भावना दुखावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भोई समाज युवा सेवा संघाने केला आहे.

भोई समाजाचे प्रतिनिधी सदाभाऊ साटोटे यांनी सांगितले की, “ही घटना अत्यंत निंदनीय असून, समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान झाला आहे. लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर भोई समाज तीव्र आंदोलन छेडेल.”

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!