ह.भ.प. कृष्णाजी महाराज नवले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता…
पैठण, दि. २६ (प्रतिनिधी)
पैठण तालुक्यातील मौजे कौंदर येथे शनैश्वर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अंखड हरिनाम सप्ताहाची सोमवारी, दि. २६ मे रोजी ह.भ.प. कृष्णाजी महाराज नवले यांच्या सुमधुर वाणीतून काल्याच्या कीर्तनाने भव्य सांगता झाली.
या सप्ताहात दररोज विविध किर्तनकारांनी भक्तीमय कीर्तने आणि प्रवचने सादर केली. सांगता सोहळ्याच्या दिवशी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी काल्याच्या कीर्तनास हजेरी लावली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश महाराज तळपे आणि भागवताचार्य ह.भ.प. सुनिताताई गायके उपस्थित होते. कौंदर आणि नांदर परिसरातील अनेक भाविकांनीही या कार्यक्रमात सहभागी होऊन हरिनाम सप्ताहाचा आध्यात्मिक लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.




















