Homeताज्या बातम्याठाण्यात ‘महाशक्तीप्रवेश’! — “शिवसेनेचा भगवा प्रत्येक नगरपालिकेवर फडकणार!”

ठाण्यात ‘महाशक्तीप्रवेश’! — “शिवसेनेचा भगवा प्रत्येक नगरपालिकेवर फडकणार!”

राज्यातील १६ विभागांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या उत्साहात शिवसेनेत प्रवेश….

 “स्पीड ब्रेकर सरकार गेलं, विकासाचं इंजिन वेगात” — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर टोला…

ठाणे, दि. १० : अजय मगरे

ठाण्यात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यातील विविध १६ विभागांमधील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या ‘महाशक्तीप्रवेश’ सोहळ्यात शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार करत सांगितले की, “आजच्या या प्रवेशामुळे शिवसेना अधिक सबळ झाली आहे. शिवसेनेचा भगवा प्रत्येक नगरपालिकेवर फडकणार, यात शंका नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडीच्या काळात विकासाच्या वाटेवर ‘स्पीड ब्रेकर’ लावण्यात आले होते. मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर ते सारे अडथळे दूर करून विकासाला गती दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘लेक लाडकी लखपती’ आणि विविध महिला सक्षमीकरण योजना या आमच्या सरकारच्या संवेदनशील भूमिकेचं उदाहरण आहेत.”

विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटलं, “आम्ही दिलेला शब्द पाळतो, प्रिंटिंग मिस्टेकच्या सबबी देत नाही. विरोधकांकडे मुद्दे नाहीत, त्यामुळे ते केवळ आरोप करत बसले आहेत. पण माझं उत्तर म्हणजे माझं काम आहे.”

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना शिंदे म्हणाले, “अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे. त्यांना मदतीचा हात देणं हे आमचं कर्तव्य आहे.”

मुंबईतील विकासकामांचा आढावा घेताना शिंदे म्हणाले, “कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो आणि सर्व रस्त्यांचं कॉंक्रिटीकरण ही कामं आम्ही मार्गी लावली आहेत. आता मुंबईत खड्डा शोधूनही मिळणार नाही!”

कार्यकर्त्यांना आवाहन करत त्यांनी सांगितले, “आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्येही महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. जो काम करेल तोच पुढे जाईल.”

शेवटी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत शिंदे म्हणाले, “विकास, विश्वास आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालणारी हीच खरी जनतेची शिवसेना आहे!”

याप्रसंगी उबाठा सचिव व प्रवक्ता डॉ. संजय लाखे पाटील, धुळे येथील नगरसेवक जितेंद्र जगताप, विनोद जगताप, वसंत पावरा, मनसे माथाडी उपाध्यक्ष प्रथमेश चव्हाण, अमित जंगम (रायगड), गोपीनाथ संसारे, विकी जाधव, शमशुद्दीन शेख आदींसह अनेकांनी मोठ्या उत्साहात शिवसेनेत प्रवेश केला.

कार्यक्रमाला शिवसेना सचिव राम रेपाळे, उपनेते दत्ता दळवी, उपनेत्या सुवर्णा करंजे, धुळे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, मा. नगरसेवक पांडुरंग पाटील, एकनाथ भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!