Homeताज्या बातम्यानगर-मनमाड महामार्गावर कोपरगांवजवळ दोन कारचा अपघात;

नगर-मनमाड महामार्गावर कोपरगांवजवळ दोन कारचा अपघात;

सुदैवाने जीवितहानी टळली

कोपरगांव, दि.२७ (दिलीप गायकवाड )

नगर-मनमाड महामार्गावरील कोपरगांवजवळ आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन फोर व्हीलर गाड्यांमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. हा अपघात कोपरगांव येथील बेट, कोठारी फर्निचर शोरूम व कातकडे क्रिकेट स्टेडियमजवळ घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही वाहनचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या वळणावर लिंबाच्या झाडामुळे दृश्यमानता कमी झाली आणि त्यामुळे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. संबंधित ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडले असून, केवळ चार दिवसांपूर्वीच एक ट्रक रस्ता सोडून बाजूला गेल्याची घटना घडली होती.

या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मागील आठवड्यात पुणतांबा फाटा येथे एका महिलेला कॅन्टरने चिरडले होते. त्या अपघातात महिलेला जागीच मृत्यू आला होता. या अपघातांमागे महामार्गावरील अपूर्ण कामे, रस्त्यावरील खड्डे, आणि पावसामुळे निर्माण होणारी चिखलमय अवस्था ही प्रमुख कारणे असून, या मार्गावर सतत खडी, माती आणि खोदकाम सुरू असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी यासाठी आमदार व प्रशासन यांना जबाबदार धरले असून, अपघात टाळण्यासाठी कोणतेही ठोस उपाय केले जात नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदारांचे ठेकेदारांवर नियंत्रण नसल्यामुळे विकासकामे अर्धवट असून नागरिक याचा त्रास भोगत आहेत.अपघातग्रस्त रस्त्यावर तातडीने उपाययोजना करून वाहतुकीस सुरक्षित बनवावे, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!