Homeताज्या बातम्यासायन प्रतीक्षा नगरात महिलांना संधी; पुरुषांना ‘जय महाराष्ट्र

सायन प्रतीक्षा नगरात महिलांना संधी; पुरुषांना ‘जय महाराष्ट्र

वार्ड क्र. १७३ महिलांसाठी आरक्षित ; दिग्गजांचे स्वप्न भंगले!

मुंबई, दि. १३ : मंगेश म्हात्रे

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी जाहीर झालेल्या सोडतीत सायन येथील वार्ड क्र. १७३ (प्रतीक्षा नगर) हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठरल्याने स्थानिक राजकारणात चांगलीच रंगत आली आहे. या निर्णयामुळे अनेक पुरुष दिग्गजांचे नगरसेवकपदाचे स्वप्न धुळीस मिळाले असून, महिला नेत्यांसाठी राजकीय संधीची नवी दारे खुली झाली आहेत.

संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा :

या वार्डात सध्या शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात चुरस अपेक्षित आहे.

ठाकरे गटातून माजी नगरसेविका प्रणिता वाघधरे, भाजपकडून शिल्पा केळुसकर, वैशाली पगारे आणि अर्चना जाधव तर शिंदे गटातून निकिता पवार यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. जर शिंदे गट आणि भाजप यांच्यात युती साधली नाही, तर या वार्डात तिरंगी लढत रंगण्याची दाट शक्यता आहे.

महायुतीत समन्वयाचा अभाव :

कागदावर महायुती बलाढ्य वाटत असली, तरी स्थानिक स्तरावर शिंदे गट आणि भाजप यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवतो. दोन्ही पक्षातील गटबाजी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना या मतदारसंघात गटबाजी मिटविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

महाविकास आघाडीचे समीकरणही रंजक :

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या प्रणिता वाघधरे यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीला अधिकृत मान्यता मिळालेली नसली, तरी दोन्ही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते पातळीवर समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मराठी मतदार निर्णायक ठरणार:

प्रतीक्षा नगर हा प्रामुख्याने मराठी भाषिक परिसर असल्याने ठाकरे गटाला नैसर्गिक फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र नव्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असून, गाफील राहिल्यास कोणत्याही पक्षाचे समीकरण उलटू शकते.

वार्ड क्र.१७३ मध्ये महिलांसाठी संधी खुली झाल्याने सायन प्रतीक्षा नगरचा राजकीय रंगमंच सज्ज झाला आहे. आगामी काळात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होताच निवडणुकीचा माहोल चांगलाच तापणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

error: Content is protected !!