Homeताज्या बातम्याआर्थिक तूट असताना आलिशान गाड्यांवर लाखोंची उधळपट्टी; जखमी दीपा चौधरींना न्याय कधी?...

आर्थिक तूट असताना आलिशान गाड्यांवर लाखोंची उधळपट्टी; जखमी दीपा चौधरींना न्याय कधी? – शेकाप ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे*

ठाणे, दि. ३ ( अजय मगरे)

*ठाणे महानगरपालिका एकीकडे आर्थिक तूट, निधीअभावी विकासकामे रखडल्याचा दावा करत सुमारे ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याची तयारी करत आहे*. मात्र दुसरीकडे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या आलिशान वाहनांची खरेदी केली जात असल्याचा निषेध
*शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे* यांनी केला आहे.

याबाबत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देऊन वाहन खरेदीचा निर्णय कोणी घेतला, त्यास मंजुरी कोणत्या ठरावाद्वारे देण्यात आली, आर्थिक तूट असताना निधी कोणत्या तरतुदीतून उपलब्ध करण्यात आला, यासह विविध प्रश्नांची लेखी उत्तरे देण्याची मागणी करण्यात आली आहे.

याचबरोबर ब्रह्माळा तलाव परिसरात झाड पडून गंभीर जखमी झालेल्या **सौ. दीपा चौधरी** यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दोन वेळा निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नसल्याचा आरोप ऋषिकेश तायडे यांनी केला.

“एका जखमी नागरिकाला न्याय देण्यासाठी निधी नसल्याचे सांगितले जाते, मात्र महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान वाहनांसाठी लाखो रुपयांचा निधी सहज उपलब्ध होतो. ही जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टी असून नागरिकांशी अन्याय करणारी भूमिका आहे,” असे ऋषिकेश तायडे यांनी म्हटले आहे.

महापालिका प्रशासनाने सौ. दीपा चौधरी यांना तात्काळ न्याय व योग्य नुकसानभरपाई द्यावी तसेच आलिशान वाहन खरेदीबाबत सर्व माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अन्यथा शेतकरी कामगार पक्ष, ठाणे शहरच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या आर्थिक तुटीच्या दाव्याचा निषेध म्हणून *भिक मागो आंदोलन* करण्यात येईल. या आंदोलनाची सुरुवात आयुक्तांच्या दालनातून करण्यात येणार असून त्यानंतर *महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या दालनात* जाऊन प्रतीकात्मक स्वरूपात भिक मागण्यात येईल. जखमी नागरिकांना न्याय देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ही प्रतीकात्मक मागणी असेल, असे ऋषिकेश तायडे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!