Homeताज्या बातम्याकोपरगावचे शाहिर राजाभाऊ माळवे;  चार दशकांपासून शाहिरी, कविता व लोककला क्षेत्रात...

कोपरगावचे शाहिर राजाभाऊ माळवे;  चार दशकांपासून शाहिरी, कविता व लोककला क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान,  तरीही शासनाकडून उपेक्षा

कोपरगाव, दि. १४ : दिलीप गायकवाड

कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील शाहिर राजाभाऊ निवृत्ती माळवे (वय ६५) हे गेली चार दशके लोककला, कविता, साहित्य आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनजागृतीचा दीप प्रज्वलित ठेवत आहेत. साध्या शेतकरी कुटुंबात पत्नी, मुलगा अमोल राजाभाऊ माळवे आणि विवाहित मुलगी यांच्यासह राहणारे राजाभाऊ माळवे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कला-संस्कृतीचा वारसा जपला आहे.

१९७६ मध्ये शाहिरी क्षेत्रात पदार्पण करत त्यांनी कोपरगाव येथील ‘मायगाव देवी पोथी,महात्म्य हे लेखन करून स्थानिक सांस्कृतिक इतिहासाची नोंद केली. त्यांचे आजोळ धामोरी येथे असून, आई सोन्याबाई निवृत्ती माळवे यांच्याकडूनच त्यांना लोककलेचे संस्कार मिळाले.

राजाभाऊ माळवे यांच्या कार्याची दखल घेत माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे, सहकारमहर्षी मा. शंकरराव कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला आहे. ‘शाहिर’ ही पदवी कोपरगाव परिसरातील लोकांनी प्रेमाने त्यांना बहाल केली. जिल्हा दारूबंदी प्रचार मोहीम (नाशिक १९९६-९७) मध्ये त्यांनी प्रभावी सहभाग नोंदवला. त्यांच्या कार्याबद्दल पुणे येथे विशेष गुणवंत प्रशस्तीपत्र, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे (२००९, २०११) सन्मान, शाहिर दत्ता वाघ लोककला पथक नाशिकचे साहित्य-कला यात्रेचे सन्मानचिन्ह, राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळ नाशिक-१ आणि सांस्कृतिक व शैक्षणिक विकास मंडळ अकोला यांचे प्रशस्तीपत्र तसेच राज्यस्तरीय साहित्य स्पर्धा (१९९७) मधील प्रथम पारितोषिक अशा अनेक मानपत्रांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

तथापि, इतक्या वर्षांच्या कार्यानंतरही शासनाकडून त्यांच्या योगदानाची दखल घेतलेली नाही. ‘न्यायासाठी झुंज’ ही त्यांची कथा लोकांमध्ये गाजली असून, आजही ते तितक्याच उत्साहाने साहित्य आणि लोककलेची सेवा करत आहेत. सोनार समाजातील राजाभाऊ माळवे यांचा मुलगा मोलमजुरी करून घर चालवतो, तरीही कलेचा ध्यास आणि लोकसंपर्क यांची तळमळ मात्र कायम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!