Homeताज्या बातम्याकोपरगावात ज्येष्ठ नागरिक कार्ड वितरण ठप्प; वृद्धांची ओळखपत्रासाठी धावपळ

कोपरगावात ज्येष्ठ नागरिक कार्ड वितरण ठप्प; वृद्धांची ओळखपत्रासाठी धावपळ

कोपरगाव, दि. ९ : दिलीप गायकवाड

कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमधील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र मिळत नसल्याने ते विविध सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत.

७० वर्षीय शेतकरी दिपक कचेश्वर लोहकणे यांनी या संदर्भात तहसील कार्यालय, निवासी नायब तहसीलदार प्रफुल्ला सातपुते, महसूल तहसीलदार चंद्रशेखर कुलथे तसेच संजय गांधी योजना कार्यालयात चौकशी केली असता, सध्या हे ओळखपत्र देण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. सेतू केंद्रातही तपासणी केली असता ते बंद असल्याची माहिती देण्यात आली व आधारकार्ड वापरण्याचा सल्ला देण्यात आला.

लोहकणे यांच्यासह गणपत जनार्दन रक्ताटे, रामदास कारभारी वादे, शंकर गणपत रवंदकर आदी ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, पूर्वी मिळणारे हे ओळखपत्र अनेक शासकीय योजनांसाठी अत्यावश्यक आहे. विशेषत: केंद्र सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी याची गरज भासते. मात्र, आता हे कार्ड का बंद झाले याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिक संभ्रमात आहेत.

“जर सरकारने हे ओळखपत्र देणे बंद केले नसेल, तर कोपरगाव तालुक्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना हे कार्ड तातडीने मिळाले पाहिजे,” अशी मागणी या ज्येष्ठ नागरिकांनी केली असून, लवकरच यासाठी तीव्र पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळत नसल्याने वृद्धांना लाभ घेण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे लवकरात लवकर कार्ड वितरण पुन्हा सुरू करण्याची मागणी बहुजन शक्ती सामाजिक संस्थे कडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!