Homeताज्या बातम्याछत्रपती संभाजीनगरात १ हजार रोजगार उपलब्ध होणार 

छत्रपती संभाजीनगरात १ हजार रोजगार उपलब्ध होणार 

शेंद्रा-बिडकीन (ऑरिक) औद्योगिक क्षेत्रात नवीन भूखंड वाटप; २०० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक…..

नवी दिल्ली, दि.२३, अजय मगरे

छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र ‘ऑरिक’मध्ये विविध उद्योगांना नवीन भूखंड वाटपास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमधून तब्बल २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होणार असून सुमारे १ हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (एमआयटीएल) आणि राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ (एनआयसीडीसी) यांच्या संयुक्त समितीने या वाटपास मान्यता दिली. प्रकल्प प्रस्तावांची तपासणी व्यवहार्यता, उलाढाल, जमीन आवश्यकता आणि विस्तार योजना यावर आधारित होती.

गुंतवणूक व रोजगार निर्मिती

सायन्स फॉर सोसायटी टेक्नो सर्व्हिसेस प्रा. लि. : सेक्टर १२ मध्ये ३७,३८८ चौ.मी. भूखंड; विशेष अन्न घटक प्रकल्पासाठी १०४ कोटींची गुंतवणूक; ३२५ रोजगार.

सु-तंत्रा पेपर प्रॉडक्ट्स प्रा. लि. : सेक्टर ५ मध्ये ३७०.७९ चौ.मी. भूखंड; विद्यमान युनिटच्या विस्तारासाठी गुंतवणूक; उलाढाल ८-१० कोटी.

अलंकार इंजिनीअरिंग इक्विपमेंट्स प्रा. लि. : सेक्टर ५ मध्ये ७,३७८ चौ.मी. भूखंड; रस्ते बांधकाम यंत्रसामग्री प्रकल्पासाठी १७.५ कोटींची गुंतवणूक.

लॉन्बेस्ट इंडिया प्रा. लि. : सेक्टर १२ मध्ये ३७,३८८.७० चौ.मी. भूखंड; इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन प्रणालीसाठी ११० कोटींची गुंतवणूक; ५०० रोजगार.

ऑरिक : हे भारतातील पहिले ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहर असून दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत विकसित होत आहे. येथे अत्याधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल प्रशासन, लॉजिस्टिक्स व निवासी क्षेत्रांचा एकात्मिक संगम उपलब्ध आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल आणि डीपीआयआयटी सचिव अमरदीप सिंह भाटिया यांनी अलीकडेच भेट देऊन गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढविण्यावर भर दिला. शासन सातत्याने उद्योग क्षेत्रातील अडचणी दूर करून गुंतवणूक वृद्धीस चालना देत आहे.

या मंजूर प्रकल्पांमुळे छत्रपती संभाजीनगर परिसरात केवळ गुंतवणुकीत वाढ होणार नाही, तर रोजगार निर्मितीद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!