Homeताज्या बातम्याठाणेकरांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲम्युझमेंट पार्क...

ठाणेकरांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲम्युझमेंट पार्क…

खाडी किनारी ५० एकरात भारतातील सर्वांत उंच व्हिविंग टॉवर; बीओटी तत्त्वावर विकास

ठाणे, दि.१५ : अजय मगरे

ठाणेकरांच्या मनोरंजन, पर्यटन आणि क्रीडा सुविधांमध्ये भरीव भर घालणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प लवकरच साकार होणार आहेत. ठाणे खाडी किनारी तब्बल ५० एकर क्षेत्रात भारतातील सर्वांत उंच व्हिविंग टॉवर उभारण्यात येणार असून त्याची उंची २६० मीटर असेल. फ्रान्समधील आयफेल टॉवर ३०० मीटर उंच असल्याने हा टॉवर देशातील मानबिंदू ठरणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुविधा उभारल्या जाणार आहेत. कासारवडवली येथे आधुनिक कन्व्हेन्शन सेंटर, तर कोलशेत परिसरात २५ एकरमध्ये टाऊन पार्क साकारले जाईल. आगरी-कोळी संस्कृतीचे दर्शन घडवणारे संग्रहालय, अत्याधुनिक मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क, ॲम्युझमेंट पार्क आणि ॲडव्हेंचर पार्कही विकसित करण्यात येणार आहेत.

याशिवाय ठाण्यात १२.५ एकरमध्ये पक्षी संग्रहालय, २५ एकरमध्ये भव्य म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर आणि ५० एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. या सुविधांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना उच्च दर्जाच्या क्रीडा-सुविधा उपलब्ध होतील, तसेच शहराचे पर्यटनमूल्य लक्षणीय वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देत ठाणे महापालिकेकडून मीरा-भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडणारा १८.४ किलोमीटर लांबीचा ‘आनंदवन’ हरित पट्टा विकसित करण्यात येणार आहे. या हरित पट्ट्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडून ठाणेकरांचे जीवनमान उंचावेल.

या बहुतेक प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून सर्व प्रकल्प बीओटी (बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर) तत्त्वावर विकसित केले जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे ठाण्याच्या विकासाचा वेग अधिक वाढेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण: पाचही संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला; न्यायालयीन कोठडी कायम

नाशिक:प्रतिनिधी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत झालेला कथित छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणाने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणातील पाच मुख्य संशयितांच्या...

रहिवाशांच्या विरोधानंतर पीसीएमसी स्थायी समितीने पुनावळे शाळेचा जमीन भाडेपट्टा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला

पुणे : रहिवाशांच्या तीव्र विरोधाला तोंड देत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी पुनावळे येथील शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

error: Content is protected !!