Homeताज्या बातम्याठाण्यातील मेडिकल स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांच्या पात्रता व परवान्यांची तपासणी करण्याची FDA कडे शेकापची...

ठाण्यातील मेडिकल स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांच्या पात्रता व परवान्यांची तपासणी करण्याची FDA कडे शेकापची मागणी

ठाणे दि.२१.प्रतिनिधी 

ठाणे शहरातील मेडिकल स्टोअर्समध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रता, वैध परवाने आणि संबंधित कागदपत्रांची विशेष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या औषध विक्री व्यवसायात नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे. मात्र, काही ठिकाणी अपात्र व्यक्तींकडून औषध विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध अनियमित घटनांच्या पार्श्वभूमीवर मेडिकल स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांची पात्रता तपासणे गरजेचे असल्याचे तायडे यांनी नमूद केले आहे.

अलीकडील काळात ठाणे आणि परिसरात बोगस डॉक्टर, बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे सुरू असलेले वैद्यकीय व्यवसाय तसेच आरोग्य क्षेत्रातील गैरप्रकार समोर आले आहेत. त्यामुळे औषध विक्री केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वैध परवाने आहेत की नाही, याची FDA विभागाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन, अपात्र कर्मचारी, परवान्यांच्या अटींचा भंग किंवा अन्य अनियमितता आढळल्यास संबंधित मेडिकल स्टोअर मालक व जबाबदार व्यक्तींविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि औषध विक्री क्षेत्रात पारदर्शकता व कायद्याचे पालन सुनिश्चित व्हावे, यासाठी FDA ने विशेष तपासणी मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे,” असे मत ऋषिकेश तायडे यांनी व्यक्त केले.

या मागणीमुळे ठाण्यातील मेडिकल स्टोअर्सच्या कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित होण्याची शक्यता असून FDA प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोपरगावातील राखीव वनक्षेत्राची होत आहे लूट; मुरूम-पोयटा माफियांचे धुमाकूळ! नागरिकांचा गंभीर आरोप

कोपरगाव : दिलीप गायकवाड   कोपरगाव तालुक्यातील राखीव वनक्षेत्रात मुरूम, पोयटा आणि दगड माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. समृद्धी महामार्गाच्या विविध कामांसाठी वाढलेल्या...

विलीन झालेल्या भागातील रहिवासी पर्यायी दिवसाच्या वेळापत्रकानुसार दररोज एक तास पाणीपुरवठ्यासाठी दाबतात

नळ कोरडे पडत असल्याने शहराच्या काही भागात खाजगी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणे : पुण्याच्या विलीन झालेल्या भागातील रहिवासी आणि...

राज्याने भाडेपट्ट्यावरील जमिनीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे, संग्राहकांनी तीन महिन्यांत नोंदी...

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूतकाळात अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या नोंदीमुळे पट्टेधारकांना सार्वजनिक जमीन खाजगी मालमत्ता मानायला लावली. त्यामुळे न्यायालयीन वाद आणि मालकी हक्काच्या...

मुलाची डायरी स्त्रीला विचित्र प्रेम, एकटेपणा आणि सामाजिक कलंक यांचा सामना करण्यास भाग पाडते

एक माधव बाग या नाटकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रदर्शनाआधी अभिनेत्री सुहिता थत्तेने रिहर्सल केली. पुणे : 50 मिनिटांचा एकपात्री नाटक एक माधव बाग मधील...

लग्नाच्या काही महिन्यांपूर्वी, 26 वर्षीय पुणेकर मंगेतरसोबत वाढदिवसाला निघाले, लोहगड किल्ल्यावर 400 फूट पडून...

छायाचित्रे काढण्याच्या प्रयत्नात केतन विशाल अग्रवाल 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर छायाचित्रे काढत...

error: Content is protected !!