ग्रामीण भागात उन्हाचा वाढत्या तडाखामुळे नागरिक उकाड्याने हैराण,
दावरवाडी ता.-( अभिजित सोनवणे )
३०एप्रिल-मे महिन्यात वाढलेल्या प्रखर उन्हामुळे जनजीवन अक्षरक्ष; विस्कळीत, हैराण झाले आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असुन दूपारच्या वेळेत बाहेर पडणेही नागरिकांनसाठी कठीण झाले आहे. या उष्णतेचा परिणाम आता लग्न समारंभ व ईतर कार्यक्रमातही दिसुन येत आहे. सध्या लगन सराईचा हंगाम जोरात सुरू असतांना नवरदेव जोमात मात्र वर्हाडी कोमात अशी स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
सध्या लग्नसराईचा आंनद आणि उन्हाचा त्रास यामध्ये वऱ्हाडी अडकले असुन, नवरदेव जोमात, वर्हाडी कोमात, ही म्हण वास्तवात उतरल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. एप्रिल -मे महिन्यांत सर्वाधिक विवाह सोहळे होत असल्याने शहरासह ग्रामीण भागातही लग्नाची लगबग वाढली आहे. मात्र यंदा उन्हाचा तीव्रतेने वाढलेला तडाखा पाहता वऱ्हाडी मंडळींची अक्षरक्ष; दमछाक होत आहे. लग्नाच्या मिरवणुका, हॉटेलमध्ये होणारे कार्यक्रम, तसेच जेवणाच्या वेळेस उकाड्यामूळे पाहुण्यांची अवस्था बिकट होत आहे. दूपारच्या वेळेत होणाऱ्या लग्नामध्ये वर्हाडी मंडळी सावलीचा शोध घेताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी मंडपात पंखे, कुलर, असुनही उष्णतेवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. परिणामी काही पाहुणे कार्यक्रम अर्धवट सोडून निघुन जात असल्याचे बघावयास मिळते. याउलट नवरदेव-नवरी हे समारंभात केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांना सर्व व्यवस्था उपलब्द असते, त्यामुळे ते उत्साहात दिसतात : मात्र वर्हाडी उकाड्यामुळे हैराण झाल्याचे दिसते. उन्हामुळे लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. जसे
की डोकेदुखी ,चक्कर येणे, अंगदुखी, उलटी मळमळ, अशक्तपणा जाणवणे असे प्रकारही वाढले आहेत. काही ठिकाणी उष्माघाताच्या घटनाही समोर येत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
डॉ. समाधान पाचोडे (वैद्यकीय अधिकारी, नांदर
लग्न आयोजकांनीही आता वेळेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या थंड वेळेत लग्नसोहळे ठेवण्याकडे कल वाढत आहे.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवणे अंत्यत आवश्यक आहे. तसेच थंड पाणी, लिंबुपाणी, सरबत, लग्न समारंभात हलके कपडे परिधान करणे, भरपुर पाणी पिणे शक्यतो उन्हात जास्त वेळ न राहणे गरजेचे आहे.




















