कोपरगाव, दि.२९ : दिलीप गायकवाड
आमदार आशुतोषदादा काळे यांच्या प्रयत्नांतून २५ लाख रुपये निधीतून बांधण्यात येणाऱ्या तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन आज स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांची प्रशासकीय कामे सुलभ होणार असून, महसूल विभागाच्या सेवा गावातच उपलब्ध होणार आहेत.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे मा.उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे, संचालक मनोज जगझाप, सुनिल मांजरे, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक चंद्रशेखर कडवे, दगुबाबा भाकरे, शिवाजीराव वाघ, नारायण बारे, विलास भाकरे, सचिन कुऱ्हाडे, भाऊसाहेब माळी, बाबासाहेब वाणी, अविनाश आहिरे, आनंदराव वाघ, सुनिल गाडे, बाळासाहेब भाकरे, दत्तात्रय कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे धामोरी परिसरातील नागरिकांना महसूल विषयक कामांसाठी होणारी धावपळ थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमाची माहिती सुनिल गाडे चासनळी यांनी दिली.


















