Homeताज्या बातम्यानांदर येथे विवाहितेचा शेततळ्यात पडून मृत्यू पोलिस बंदोबस्तात पार पडले अंत्यसंस्कार

नांदर येथे विवाहितेचा शेततळ्यात पडून मृत्यू पोलिस बंदोबस्तात पार पडले अंत्यसंस्कार

नांदर, दि. ७ : ( अभिजीत सोनवणे)

पैठण तालुक्यातील नांदर गावात सोमवारी (दि. ६) दुपारी झालेल्या दुर्दैवी घटनेत राधिका संतोष शेळके (वय २४) या विवाहितेचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला. घटनेनंतर ग्रामस्थांत हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राधिका शेळके या दुपारी तीनच्या सुमारास स्वतःच्या शेतातील शेततळ्यात पडल्या. त्यांना तातडीने बाहेर काढून पैठण येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्या मृत असल्याचे घोषित केले.

राधिका यांचे माहेर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुंदरवाडी येथे असून, त्यांच्या पश्चात तीन वर्षांची दोन जुळी मुले आहेत.

मंगळवार (दि. ७) दुपारी चार वाजता नांदर येथील स्मशानभूमीत पोलिस बंदोबस्तात त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया शांत वातावरणात पार पडली.

या वेळी पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी, सपोनि सचिन पंडित, फौजदार गोविंद राऊत आदी अधिकारी उपस्थित होते. त्यांनी नातेवाईकांशी संवाद साधून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया होईल, असे सांगितले.

या प्रसंगी ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेने नांदर परिसरात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

error: Content is protected !!