Homeताज्या बातम्यामनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा

नवी मुंबई, (सतीश गायकवाड )

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला आहे. नवी मुंबई संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री मारुतीराव खुटवड यांच्या पुढाकाराने व सहकार्याने शहरातील कार्यकर्त्यांनी मुंबईत दाखल झालेल्या मराठा समाज बांधवांसाठी भोजनदानाची व्यवस्था केली आहे.

आरक्षणासाठी एकमुखी मागणी करत राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या बांधवांना जेवणाच्या सोयीअभावी त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भोजनदान उपक्रम राबवून आंदोलनकर्त्यांना मदतीचा हात दिला.

सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईत गर्दीचे वातावरण आहे. तरीदेखील मराठा समाजाच्या ऐतिहासिक आरक्षणासाठी पाच लाखांहून अधिक बांधवांची उपस्थिती लक्षणीय ठरत आहे. त्यांना भोजनाची सोय करून देत संभाजी ब्रिगेडने फक्त संघटनात्मक पाठिंबा नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीच्या माध्यमातून ठोस भूमिका घेतली आहे.

जिल्हाध्यक्ष शिवश्री मारुती खुटवड यांनी सांगितले की, “सरकारने विलंब न लावता मराठा समाजाला न्याय द्यावा व आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय घ्यावा, हीच आमची मागणी आहे.”

यामुळे नवी मुंबईतील संभाजी ब्रिगेडने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला दृढ पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!