ठाणे, दि.१ : अजय मगरे
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांची नवी रचना जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने २२ ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली.
या अधिसूचनेनुसार ठाणे महापालिकेत एकूण १३१ नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यासाठी ३३ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यात –
३२ प्रभाग चार सदस्यीय, १ प्रभाग तीन सदस्यीय,पाच सदस्यीय प्रभाग नाही
अशी विभागणी करण्यात आली आहे.
नागरिकांना या प्रभाग रचनेबाबत हरकती किंवा सूचना द्यायच्या असल्यास त्या ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत महापालिका आयुक्तांकडे लेखी स्वरूपात सादर कराव्या लागतील. त्यानंतर आलेल्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
येऊ घातलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने प्रभागांच्या हद्दी व वर्णन निश्चित करण्यात आले असून, वॉर्ड क्रमांक : १७ किसननगर क्र.२ या प्रभागाची माहिती अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रभागाची लोकसंख्या :
एकूण – ५६,३०६
अनुसूचित जाती – ४,९०३
अनुसूचित जमाती – ७०५
प्रभाग हद्दीचे वर्णन :
उत्तर दिशेला : किसननगर नं. २, एम.आय.डी.सी. परिसर
पूर्वेकडे : नेहरूनगर, अंबिका नगर
दक्षिणेकडे : यूनायटेड फॉस्फरस कंपनीची कुंपणभिंत, वागळे इस्टेट मुख्य रस्ता (S.G. Barve Road), वागळे इस्टेट मुख्य रस्ता, मयुरी अपार्टमेंट परिसर
पश्चिमेकडे : वागळे इस्टेटपासून रोड क्र.३४, रोड क्र.१६, रोड क्र.३३मार्गे एम.सी.जी.एम. पाईपलाईन परिसर, सोपारकर इंडस्ट्रियल इस्टेट, निशिगंधा सोसायटी, ग्रीन रेस्टॉरंट, आश्रम रोडमार्गे लॅन्सेम हाऊस, रोड क्र.२०, रोड क्र.३४ पर्यंत
या प्रभागात ठाण्याच्या औद्योगिक पट्ट्याचा मोठा भाग, गृहनिर्माण संकुले तसेच जुन्या वस्त्यांचा समावेश असून, मतदारसंख्या लक्षणीय आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत या प्रभागात चुरशीची लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.




















