Homeताज्या बातम्यामुंबई-नाशिक महामार्गावरील रखडलेल्या रस्ते कामांना गती द्या' – उपमुख्यमंत्री शिंदे यांचे...

मुंबई-नाशिक महामार्गावरील रखडलेल्या रस्ते कामांना गती द्या’ – उपमुख्यमंत्री शिंदे यांचे एमएसआरडीसीला निर्देश…

मुंबई, दि.३० ( प्रतिनिधी )

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मार्फत सुरू असलेल्या रस्ते विकास प्रकल्पांना वेग द्यावा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील रखडलेली कामे मॉन्सूनपूर्वी पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

राज्यात सुरू असलेल्या विविध रस्ते प्रकल्पांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कामांची गुणवत्ता आणि वेळेच्या चौकटीत पूर्णता या दोन्ही बाबींवर भर दिला. या बैठकीस एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विशेषत: मुंबई-नाशिक महामार्गावरील रखडलेल्या ३१ किमी लांबीच्या काँक्रीटीकरण कामांना गती देण्याचे आदेश देताना, उपमुख्यमंत्र्यांनी पिंपळास चारोटी, रेल्वे ओव्हर ब्रिज यांसारख्या ठिकाणच्या रखडलेल्या कामांचीही नोंद घेतली. “कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर नोटीस पाठवून ताकीद द्या,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

रेल्वे पुलाच्या कामासाठी गर्डर आल्यानंतर तत्काळ रेल्वेकडून मेगाब्लॉक घेऊन काम पुढील महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच कशेळी येथील खाडीवरील पूल ऑक्टोबरपर्यंत, तर कळवा खाडी पूल जूनअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्टही त्यांनी समोर ठेवले.

“ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक येत्या पावसाळ्यात सुरळीत राहील, याची खात्री करा,” असा ठाम आदेश देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणेला कामात कसूर न करण्याचा संदेश दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!