Homeताज्या बातम्याअतिवृष्टीमुळे अहिल्यानगर मध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे...

अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर मध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि.२८ (प्रतिनिधी )

गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर, खडकी, वाळकी या गावांसह तीन मंडळातील ४५ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती, बंधारे, रस्ते, घरे आणि पुलांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पशुधनाची हानी झाली असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पालकमंत्री विखे पाटील यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. अकोळनेर गावातील वालुंबा नदी परिसरातील हानीची पाहणी करत ग्रामस्थांकडून माहिती घेतली. खडकी येथे ऋषिकेश निकम व शकुंतला कोठुळे यांच्या शेतीतील पिकांचे नुकसान आणि सयाजी कोठुळे यांच्या कुटुंबाला दिलासा दिला. तसेच वाळकी गावातील पूल आणि मळा परिसरातील नुकसानही त्यांनी पाहिले.

वाळकी येथे अधिकाऱ्यांकडून आढावा घेत असताना विखे पाटील म्हणाले, “मागील ५०-६० वर्षांत एकाच दिवशी एवढा पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले नाही. या संकटाच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोणतीही व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही.”

ते पुढे म्हणाले की, पंचनामे लवकर व्हावेत यासाठी इतर तालुक्यांतील मनुष्यबळ तातडीने वापरण्यात यावे. खराब झालेले रस्ते, बंधारे तातडीने दुरुस्त करावेत. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरीत राबवाव्यात.

पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून इतर तालुक्यांमधून चारा आणावा, तसेच घरांचे नुकसान झालेल्यांसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये निवाऱ्याची आणि जेवण, पाणी, औषध यांची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार शिवाजी कर्डीले, काशिनाथ दाते, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिप सीईओ आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

“नदी-ओढ्यांच्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई”

पालकमंत्री विखे पाटील यांनी नदी-ओढ्यांच्या अतिक्रमणांबाबत चिंता व्यक्त करत सांगितले की, अतिक्रमणांमुळे प्रवाह बदलल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे. भविष्यात अशी स्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून अतिक्रमण हटवावी, असे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!