Homeताज्या बातम्याअपघात टळला! कोपरगावजवळ प्रवासी बस दरीत कोसळण्यापासून वाचली..!

अपघात टळला! कोपरगावजवळ प्रवासी बस दरीत कोसळण्यापासून वाचली..!

कोपरगाव, दि.२९ ( दिलीप गायकवाड )

कोपरगावजवळील नगर-मनमाड महामार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात थोडक्यात टळला. राजस्थानमधील भिलवाडा येथून पुण्याकडे निघालेली होल्हा कंपनीची खाजगी बस कोपरगावजवळील बेट व कांचनवाडी नाका परिसरात आज ( ता.२९ ) सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान महामार्गालगत दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली.

स्थानिक वाहतूक कोंडीमुळे बसचालकाने नव्याने तयार होत असलेल्या मार्गावर बस वळवली. मात्र, त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक नसल्यामुळे आणि इतर लहान वाहने जात असल्याचे पाहून बसचालकाने बस त्या रस्त्याने नेली.

पावसामुळे रस्ता भिजलेला आणि खचलेला असल्याने बस घसरू लागली. बस उलटण्याचा अंदाज घेताच चालकाने सतर्कतेने सर्व प्रवाशांना खाली उतरवले.

बसमध्ये लहान मुले, वृद्ध आणि महिला अशा सुमारे ५०-५५ प्रवाशांचा समावेश होता. वेळेवर सर्वांना खाली उतरविल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा, रस्त्याच्या खाली खोल दरी असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

या संकटप्रसंगी बेट येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल परदेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी सांगितले की, “प्रवाशांचे प्राण वाचले, हेच खरे सौभाग्य. बस दरीत कोसळली असती, तर चित्र वेगळेच दिसले असते.” प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मार्गावर सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलावी, अशी मागणीही त्यांनी केली.

बस बाहेर काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या जेसीबी मशीनसुद्धा गाळात अडकली होती. अनेक प्रयत्नांनंतर ती मशीन बाहेर काढण्यात आली आणि बसला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.या घटनेनंतर नव्याने उभारल्या जाणाऱ्या मार्गांवर सूचना फलक व सुरक्षिततेची योग्य सोय करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. जनतेने याबाबत तत्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हिंजवडी पूर्व पावसाळ्याच्या कामांसाठी पीएमआरडीएच्या प्रमुखांनी ३१ मेची मुदत दिली, त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा

हिंजवडी परिसरात पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून स्ट्रॉम वॉटर नाले आणि नैसर्गिक नाले साफ करण्याचे काम पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने...

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला. पुणे बातम्या

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

सायन-वांद्रे लिंक रोडवर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर धारावी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई : मंगेश म्हात्रे  सायन-बांद्रा लिंक रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून अश्लील हावभाव व शब्दप्रयोग करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांवर धारावी पोलिसांनी कारवाई केली....

कचरा वेचक युनियनला नागरी कर्मचाऱ्यांसाठी पीएमसी आरोग्य योजनेत समावेश हवा आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

ग्राहक सोल्युशन्स विकत घेतात, तंत्रज्ञान नाही: पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी आनंद देशपांडे | पुणे बातम्या

आनंद देशपांडे, पर्सिस्टंट सिस्टम्सचे एमडी पुणे : ग्राहक तंत्रज्ञान विकत घेत नाहीत, ते त्यांच्या समस्यांवर उपाय विकत घेतात, असे पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक, अध्यक्ष...

error: Content is protected !!