Homeताज्या बातम्याअमली पदार्थ विरोधात कारवाया वाढविण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश...

अमली पदार्थ विरोधात कारवाया वाढविण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश…

अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्ससाठी कार्यालये व पदभरतीला गती देण्याचे आदेश….

मुंबई, दि. ७ : अजय मगरे

राज्यात अमली पदार्थांच्या विक्री, वाहतूक आणि खरेदीवर कठोर नियंत्रण आणण्यासाठी कारवाया अधिक तीव्र कराव्यात, अशी स्पष्ट सूचना गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित यंत्रणांना दिली आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ही दिशा ठरवणारी महत्वपूर्ण भूमिका मांडली.

या बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, अमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, उपसचिव राहुल कुळकर्णी, तसेच पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे आदी अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री कदम यांनी सांगितले की, राज्य शासनाने स्थापन केलेल्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्ससाठी तातडीने पदभरती प्रक्रिया पूर्ण करून कार्यक्षमता वाढवावी. या दलांसाठी प्रदेशीय कार्यालयांची स्थापना, जागा निश्चिती, तसेच कार्यालय सुरू करण्यासाठी नियोजनबद्ध, कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यमंत्री कदम म्हणाले, “अमली पदार्थ प्रकरणांतील खटल्यांचे तातडीने निपटारा करण्यासाठी कार्यवाही करावी. प्रलंबित खटल्यांची नियमित व तपशीलवार माहिती सादर करण्यात यावी.” तसेच, अधिकाऱ्यांना विशेष भत्ते व पदोन्नतीचे वेतन मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

सागरी मार्ग हा अमली पदार्थ आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, हे लक्षात घेता किनारपट्टीवरील विभागांना विशेष उपकरणे व वाहने उपलब्ध करून दिली जावीत. तसेच, सागरी किनाऱ्यांवर होणाऱ्या अमली पदार्थांच्या हालचालींवर विशेष लक्ष केंद्रित करून कारवाया अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

error: Content is protected !!