तत्पर” — जिल्हाध्यक्ष श्री. संदीप काळे.
दावरवाडी ता १६( अभिजीत सोनवणे)
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर सेना आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यात पूर्वतयारीचा भाग म्हणून आढावा बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडली.
या बैठकीस मा. खासदार श्री. संदीपान भुमरे व मा. आमदार श्री. विलासबापू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. मार्गदर्शक म्हणून शिक्षक व शिक्षकेत्तर सेना राज्य उपाध्यक्ष श्री. संजयजी तायडे, जिल्हाध्यक्ष प्राचार्य श्री. संदीप काळे, मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य श्री. निलेश गायकवाड, चित्रपट महामंडळ उपाध्यक्ष श्री. आधाने साहेब उपस्थित होते.
यावेळी श्री. सुभाष शिंदे, श्री. सचिन सेवनकर, श्री. प्रवीण मोरे, श्री. विशाल तांबे, श्री. कल्याण सोनवणे, श्री. सुनील चितळे, श्री. चेतन गर्जे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थितांशी सविस्तर चर्चा करत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आवाहन केले.
जिल्हाध्यक्ष प्राचार्य श्री. संदीप काळे यांनी आपल्या मार्गदर्शनात ठामपणे सांगितले की, शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेमार्फत शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी संघटना सदैव तत्पर राहील. तसेच आगामी शिक्षक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीस तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने येणाऱ्या शिक्षक मेळाव्यास पैठण तालुक्यातून विक्रमी उपस्थिती नोंदवण्याचा निर्धार व्यक्त केला.
सदर आढावा बैठकीमुळे शिक्षक मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक नियोजनाला वेग आला असून, तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




















